Search This Blog

Thursday, 11 May 2023

वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत - सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत पार पडली बैठक

 



वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत - सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत पार पडली बैठक

 चंद्रपूर / मुंबईदि. 11 छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल, ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनस्थित मराठी उद्योजकांनी घेतला आहे. मंगळवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता श्री. मुनगंटीवार यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे लंडनस्थित मराठी उद्योजकांशी संवाद साधला. तेव्हा मराठी उद्योजकांनी हा प्रतिसाद दिला.

श्री. मुनगंटीवार यांनी लंडनस्थित मराठी उद्योजकांच्या 'ओव्हरसीज महाराष्ट्रीयन प्रोफेशनल्स अॅण्ड आंत्रप्रेन्युअर्स ग्रुप - यूके' (ओमपेग - युके) या संघटनेच्या पदाधिकारी आणि सभासदांसोबत आंतरजालीय दूरदृष्य प्रणालीद्वारे ही बैठक आयोजित केली होती. या संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री रवींद्र गाडगीळआशुतोष देशपांडेअभिजीत देशपांडे आणि जय तहसिलदार यांच्या पुढाकाराने ही बैठक यशस्वी झाली. यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी विविध प्रश्नांनाही मनमोकळी उत्तरे दिली. लंडनस्थित मराठी उद्योजकांनी महाराष्ट्राच्या वन खात्याच्या,  सांस्कृतिक कार्य खात्याच्या आणि मत्स्यव्यवसाय खात्याच्या विविध कार्यक्रम आणि योजनांमधेही सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे यांचे ऐतिहासिक महत्वछत्रपती शिवाजी महाराजांचे भारतीय इतिहासातील महत्वशिवराज्याभिषेकाचा यंदा होणारा त्रिशतकीय सुवर्ण महोत्सवत्यानिमित्ताने राज्यभर आयोजित करण्यात येत असलेले विविध कार्यक्रम यांची माहिती आपल्या वक्तव्यात दिली. ब्रिटनच्या भारतातील उपउच्चायुक्तांसोबत जगदंबा तलवार आणि वाघनखे भारतात परत आणण्याविषयी झालेली प्राथमिक चर्चा यांची माहिती दिली. ब्रिटनमधील भारतीय आणि विशेषतः मराठी लोकांनी ब्रिटिश सरकारला मोठ्या प्रमाणात पत्रे लिहून जगदंबा तलवार आणि वाघनखे भारताला परत देण्याची मागणी करावी, असे आवाहन श्री.  मुनगंटीवार यांनी केले.

त्याप्रमाणे ब्रिटिश सरकारला मोठ्या प्रमाणात पत्रे लिहिण्याचा निर्णय आणि त्याकामी ब्रिटनस्थित सर्व भारतीयांचा सहभाग घेण्याचाही यावेळी 'ओमपेग - युकेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. विविध ब्रिटिश उच्चपदस्थ अधिकारी आणि ब्रिटिश सरकारमधील उच्चपदस्थ राजकारणी यांच्या भेटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे भारताला परत करण्याची मागणी करण्याचाही निर्णय या संघटनेने घेतला आहे.

जगदंबा तलवार आणि वाघनखे भारतात आणण्यासंदर्भात ब्रिटिश सरकारशी बोलणी करण्याकरता जेव्हा सांस्कृतिक कार्य मंत्री लंडनला जातीलतेव्हा त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आणि या कार्यात आवश्यक तो सर्व सहभाग देण्याचे लंडनस्थित मराठी उद्योजकांनी या आंतरजालीय दूरदृष्य प्रणाली बैठकीतून आश्वासन दिले आहे. तसेच लंडनस्थित मराठी उद्योजकांनी ब्रिटनमधील इतर व्यवसायातील मराठी सोबतच अन्य भारतीय व्यावसायिक व नोकरदार मंडळींना याकामी सोबत घ्यावे, असे आवाहनही श्री मुनगंटीवार यांनी केले आहे. त्याला लंडनस्थित मराठी उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

००००००

No comments:

Post a Comment