Search This Blog

Wednesday 24 March 2021

मुल येथे महिला सबलीकरण कार्यक्रम संपन्न

 मुल येथे महिला सबलीकरण कार्यक्रम संपन्न

जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे बालकांसाठीच्या कायद्याबाबत जनजागृती

चंद्रपूर, दि. 24 मार्च : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मुल तालुका येथिल ग्रामपंचायत टेकाडी येथे नुकतेच महिला सबलीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर  यांनी बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची माहिती दिली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे तालुका व्यवस्थापन अधिकारी प्रकाश तुरांणकर, कृषी व्यवस्थापक मयूर गड्डमवार, वर्षा बल्लावार तसेच  ग्रामपंचायत सरपंच सतीश चौधरी, ग्रामसेविका श्रीमती कोडापे, पोलीस पाटील प्रमोद बोमनवार,  किरण चौधरी व लीना गोवर्धन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा बल्लावार यांनी केले तर कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला सक्षमीकरण याविषयी माहिती देण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ती प्रतिभा मडावी यांनी बालकाची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 व लैंगिक शोषणापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012, व बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 याविषयी मार्गदर्शन केले. सोबतच क्षेत्रे कार्यकर्ती तेजस्विनी सातपुते यांनी सदर महिला बाल संगोपन योजना याविषयी माहिती दिली .

0 0 0

No comments:

Post a Comment