Search This Blog

Wednesday, 22 July 2020

एक लिटर दुधाच्या पॉकेट मधून अर्धा लिटर दुधाची विक्री होणार

एक लिटर दुधाच्या पॉकेट मधून
अर्धा लिटर दुधाची विक्री होणार
अर्धा लिटरच्या पॅालीथिन पॉकेटचा साठा संपल्याने निर्णय
दूध वितरक व ग्राहकांनी नोंद घेण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 22 जुलै: शासकीय दूध योजनाचंद्रपूर येथील अर्धा लिटरच्या पॅालीथिन फिल्मचा साठा संपुष्टात आल्याने अर्धा लिटरच्या पॅालीफिल्मचा साठा उपलब्ध होईपर्यंत दिनांक 23 जुलै 2020 पासून एक लिटरच्या पॅालीफिल्म मधून अर्धा लिटर पाश्‍चराईज्ड व होमोनाईज्ड टोन्ड दुधाचा पुरवठा करण्यात येईल.
अर्धा लिटर दुधाच्या पॉकिटाची किंमत 18 रु. तर एक लिटर दुधाच्या पॉकिटाची किंमत 36 रु. राहील. तरी सर्व संबंधित शासकीय दूध वितरकांनी व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दूध योजनाचंद्रपुर यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment