Search This Blog

Thursday 23 July 2020

गडचांदूर येथे अँन्टीजेन चाचणी सुरु होणार : जिल्हाधिकारी


गडचांदूर येथे अँन्टीजेन चाचणी सुरु होणार : जिल्हाधिकारी
गडचांदूर येथील कोविड केअर सेंटरला भेट
चंद्रपूरदि. 23 जुलै: जिल्ह्यातील कोरोना  प्रादुर्भाव लक्षात घेतागडचांदूर येथे अँन्टीजेन चाचणी सुरू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली. कोरोना विषयक आढावा बैठक घेताना ते बोलत होते. गडचांदूर येथील कोविड केअर सेंटरला त्यांनी यावेळी भेट दिली.
कोविड केअर सेंटरमधील नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाहीयाकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कोविड केअर सेंटरमध्ये आणखी नागरिकांच्या सुविधेसाठी उपाययोजना करण्याची सूचना संबंधित अधिकारी यांना त्यांनी दिल्यात.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेउपविभागीय अधिकारी श्री.लोंढेतहसिलदार महेंद्र वाकलेकरमुख्याधिकारी विशाखा शेळकीतालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नाळे, डॉ. टेंभे व इतर वैद्यकीय अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.
दरम्यानकोरोना संदर्भात नगर परिषद सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. गडचांदूर शहरात लॉकडाऊन संदर्भात चर्चा झाली. परंतुशहरातील आढळून आलेल्या बाधितांचा प्रवासाचा इतिहास असल्याने व त्यांचा इतरांसोबत कॉन्टॅक्ट नसल्याने लॉकडाऊनची गरज नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
00000

No comments:

Post a Comment