Search This Blog

Wednesday 29 July 2020

किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्जाचा लाभ घ्यावा : सुनील जांभुळे

किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्जाचा लाभ घ्यावा : सुनील जांभुळे

66 मत्स्य व्यावसायिकांना कर्ज मंजूर

चंद्रपूरदि.29 जुलै: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतीपूरक व्यवसायांमध्ये मत्स्य व्यवसायपशूपालन व्यवसाय इत्यादीसाठी शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता असते. जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जाचा लाभ घ्यावाअसे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सुनील जांभुळे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील 66 मस्य व्यावसायिक शेतकऱ्यांना बँकेद्वारे प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मंजूर झालेले आहे. याद्वारे आतापर्यंत 10 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. सीडीसीसी बँकेद्वारे प्रातिनिधिक स्वरूपातील कर्जाचे वाटप  श्री.पारखी  यांनी केले आहे.

मत्स्यपालन करणाऱ्या व्यावसायिक तसेच शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी ज्या बँकेत खाते आहे. त्या बँकेशी संपर्क साधून आवश्यक असणारे कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावा व प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जाचा लाभ घ्यावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment