Search This Blog

Friday 24 July 2020

जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समूहाच्या मदतीने 5300 वैयक्तिक सामूहिक परसबागा विकसित


जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समूहाच्या मदतीने
5300 वैयक्तिक सामूहिक परसबागा विकसित
उमेदकडून सीईओ राहुल कर्डीले यांचे विशेष अभिनंदन
चंद्रपूरदि. 24 जुलै: उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत माझी पोषण परसबाग विकासन मोहीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्यास्वयंसहायता समूहाच्या मदतीने जिल्ह्याने तब्बल 5 हजार 300 वैयक्तिक सामूहिक परसबागा विकसित केल्या आहेत. यासाठी उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
माझी पोषण परसबाग विकासन मोहीम दि.15 जून 2020 ते 25 जुलै 2020 या कालावधीत हाती घेण्यात आली होती. चळवळ पोषणाची - सर्वांच्या सहभागाची या उक्तीप्रमाणे 21 दिवसांच्या मोहिम कालावधीत चंद्रपुर जिल्ह्याला 3 हजार 75 वैयक्तिकसामुहिक परसबागा विकसित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टांची पूर्ती करत जिल्ह्याने 5 हजार 300 वैयक्तिक सामूहिक परसबागा विकसित केल्या आहेत.
ही आहे माझी पोषण परसबाग विकासन मोहीम:
गरोदर स्रीयास्तनदा माताकिशोरीसमुदाय संस्थांच्या सदस्या आणि बालके अशा लाखो व्यक्तीना पुरेशा प्रमाणात सेंद्रीय ताजा भाजीपाला मिळेल व त्यांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी उमेद अभियानामार्फत माझी पोषण परसबाग विकासन मोहीमे अंतर्गत जिल्ह्यातील महिलांच्या माध्यमातून वैयक्तिक सामुहिक परसबागा विकसित करणे.

00000

No comments:

Post a Comment