Search This Blog

Monday 27 July 2020

मूल येथील राईसमील मालकाविरूध्द गुन्हा दाखल

मूल येथील राईसमील मालकाविरूध्द गुन्हा दाखल
बिहार राज्यातून मजूर आणल्यानंतर गृह अलगीकरण
नियमांचा भंग केल्याचे प्रकरण
चंद्रपूर, 27 जुलै : करोना टाळेबंदीत बिहार राज्यातून मजूर आणल्यानंतर 14 दिवसांच्या गृहविलगीकरण नियमांचे पालन न करणाऱ्या मूल येथील साईकृपा राईसमिल व ओमसाईराम राईसमीलच्या संचालकां विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही राईसमिलमध्ये 25 पेक्षा अधिक मजूरांना करोनाची लागन झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या संदर्भात कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
मूल येथील साईकृपा राईसमील व ओमसाईराम राईसमिलचे संचालकांनी बिहार राज्यातून कामासाठी मजूर आणले. मजूर आणतांना विलगीकरण तथा गृह अलगीकरण आदेशाचे सक्त पालन करावे, असे या दोन्ही राईसमिल मालकांना सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी या आदेशाचे पालन केले नाही. त्याचा परिणाम या दोन्ही राईसमिलमध्ये 25 पेक्षा अधिक करोना बाधित मिळून झाले आहेत.
याप्रकरणी मूलचे तहसीलदार डी.जी. जाधव  यांच्या तक्रारीवरून साईकृपा व ओमसाईराम राईसमिलचे मालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी जानाळा येथे 50 लोकांची परवानगी असतांना 130 पेक्षा अधिक लोकांना निमंत्रीत करून विवाह समारंभ साजरा करणाऱ्या आयोजका विरूध्दही यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रतिबंधीत क्षेत्राचे नियम न पाळणे, होम कॉरेन्टाइन असताना बाहेर पडणे, मॉस्क न वापरणे अशा पद्धतीने समाजाला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वर्तणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचा संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.
00000

No comments:

Post a Comment