Search This Blog

Tuesday 28 July 2020

जिल्ह्यातील महा-ई-सेवा व सीएससी केंद्र 24 तास सुरू राहणार

जिल्ह्यातील महा-ई-सेवा व सीएससी केंद्र 24 तास सुरू राहणार

शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

चंद्रपूरदि. 28 जुलै: पिक विमा भरण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांना पिक विमा भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. शेतकरी पिक विमा भरण्यापासुन वंचित राहु नये या करीता जिल्हयातील महा ई सेवा केंद्र व सीएससी केंद्र दिनांक 29 ते 31 जुलै पर्यंत 24 तास सुरू राहणार आहे. या संदर्भातील माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आदेश काढून दिलेली आहे.

शासनाने खरीप 2020 व रब्बी 2020- 21 हंगामापासून तीन वर्षाकरिता राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एैच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2020 आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

आदेशाचे उल्लंघन झालेचे निदर्शनास आल्यास संबंधीत सेतु केंद्रमहा ई सेवा केंद्र व केंद्र चालक,आदेशाचे पालन न करणारे कोणतेही व्यक्ती, संस्था शिक्षेस पात्र असुन संबंधीत कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 व 52 तसेच साथ रोग प्रतिबंधक 1897 अन्वये व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार व महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम 2020 मधील तरतुदी अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

000000

No comments:

Post a Comment