Search This Blog

Saturday 18 July 2020

सहकारी पतसंस्थेच्या नोंदणी संबंधाने हरकती दाखल करण्याचे आवाहन

सहकारी पतसंस्थेच्या नोंदणी संबंधाने
हरकती दाखल करण्याचे आवाहन
चंद्रपूर दि.18 जुलै: समृद्ध नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,ता.चंद्रपूरचा नोंदणी प्रस्ताव सहाय्यक निबंधकसहकारी संस्था, चंद्रपूर या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. चंद्रपूर तालुक्यातील नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नोंदणी संबंधाने काही हरकती असल्यास  दि. 21 जुलै 2020 पूर्वी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,चंद्रपूर या कार्यालयात सादर कराव्यात किंवा दिनांक 21 जुलै 2020 रोजी दुपारी 1 वाजता सुनावणी ठेवण्यात आलेली असून सुनावणीच्या वेळेस सदर हरकती दाखल कराव्यात.
कार्यालयात हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न झाल्यास संबंधित संस्थेला काहीही म्हणावयाचे नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती एका प्रसिध्दीपत्रकात सहाय्यक निबंधकसहकारी संस्थाता.चंद्रपूर यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment