चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 204
जिल्ह्यातील बरे झालेल्या बाधिताची संख्या 103
मंगळवारी दुपारपर्यंत 6 बाधितांची नोंद
Ø 101 बाधितांवर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू
Ø सध्या 24 कंटेनमेंट झोन सुरू
Ø 87 हजारावर नागरिक जिल्ह्यात दाखल
Ø संस्थात्मक अलगीकरणात एक हजारावर नागरिक
चंद्रपूर,दि.14 जुलै: जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधिताची संख्या 204 झाली आहे. तर 103 बाधित कोरोना संक्रमणातून मुक्त झाले आहेत. 101 बाधित सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. त्यापैकी 15 जण हे जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे 10 जवान व 5 जण अन्य राज्याचे रहिवाशी आहेत.
आज पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी येथील 23 वर्षीय नागरिक पॉझिटीव्ह आला आहे. हैद्राबाद येथून 9 जुलैला आलेला हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता.
भद्रावती येथील बंगळूरू शहरातून 10 जुलैला परत आलेल्या 22 वर्षाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 11 जुलैला स्वॅब घेण्यात आला होता.
चंद्रपूर अंचलेश्वर गेट जवळील केरळ राज्यातून परत आलेला 28 वर्षीय युवक पॉझिटीव्ह ठरला आहे. 9 जुलैला आलेला हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. 12 जुलैला त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज पॉझिटीव्ह अहवाल आला.
या शिवाय पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कातून बाधित झालेले 3 जण पुढे आले आहेत. यामध्ये सिव्हिल लाइन चंद्रपूर येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या यापूर्वी पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेली 47 वर्षीय पत्नी, 18 व 10 वर्षीय दोन मुले यांचा सहभाग आहे. या सर्वांचा स्वॅब 12 जुलैला घेण्यात आला होता.
सध्या 24 कंटेनमेंट झोन सुरू:
जिल्ह्यात एकूण 60 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी, 36 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत. 24 कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहे.
कोविड-19 संक्रमित 204 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून, रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील देशनिहाय, राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. साऊथ आफ्रिका एक, कजागिस्तान एक, दिल्ली -9, हरियाणा (गुडगाव) दोन, ओडीसा एक, तेलंगाना दोन, गुजरात चार, हैद्राबाद-22, नागपूर 6, अकोला दोन, वाशिम एक, मुंबई-16, ठाणे पाच, पुणे-11, नाशिक चार, जळगांव एक, यवतमाळ -7, औरंगाबाद चार, कोल्हापूर तीन, श्रीनगर एक, पटना एक, अमरावती एक, राजस्थान चार, अलाहाबाद एक, बंगलोर एक, सिंगापूर एक, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-11, संपर्कातील व्यक्ती -81 आहेत.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-25, बल्लारपूर तीन, पोंभूर्णा तीन, सिंदेवाही तीन, मुल 10, ब्रह्मपुरी 28, नागभीड चार, वरोरा 8, कोरपना तीन, गोंडपिपरी एक, चिमूर दोन, भद्रावती पाच बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर पाच, वरोरा 14, राजुरा तीन, मुल एक, भद्रावती 10, ब्रह्मपुरी-14, कोरपणा, नागभिड प्रत्येकी एक तर गडचांदूर चार बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एक, बाबुपेठ चार, बालाजी वार्ड दोन, भिवापूर वार्ड दोन, शास्त्रीनगर एक, सुमित्रानगर चार, स्नेह नगर एक, लुंबीनी नगर 4, जोडदेउळ एक, तुकूम तलाव दोन, दूध डेअरी तुकूम दोन, लालपेठ एक, पोलीस मंगल कार्यालय तुकूम 10, दाद महल वार्ड, शिवाजी नगर तुकुम, इंदिरानगर तुकुम, लालपेठ, भानापेठ, बगल खिडकी, हवेली गार्डन, नवीन वस्ती दाताळा, लखमापूर हनुमान मंदिर, घुटकाळा , आजाद हिंद वार्ड तुकूम , अंचलेश्वर गेट याठिकाणचे प्रत्येकी एक बाधित तर पागल बाबा नगर तीन, वडगाव दोन, सिविल लाइन्स तीन असे एकूण बाधितांची संख्या 204 वर गेली आहे.
जिल्ह्यातील अलगीकरण विषयक माहिती:
जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 191 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 253 नागरिक,तालुकास्तरावर 513 नागरिक तर, जिल्हास्तरावर 425 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 87 हजार 329 नागरिक दाखल झाले आहेत. 85 हजार 132 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 2 हजार 197 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
00000

No comments:
Post a Comment