Search This Blog

Tuesday 28 July 2020

प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या कोरोना बाधित व संबधित कुटुंबियांवर नगरपालिका प्रशासनाकडून गुन्हा दाखल

प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या कोरोना बाधित

व संबधित कुटुंबियांवर नगरपालिका प्रशासनाकडून गुन्हा दाखल

चंद्रपूर, दि.28 जुलै: गडचांदूर येथे अमरावती वरून दाखल झालेल्या कोरोना बाधिताच्या बेजबाबदारपणाने शहरातील 11 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. सदर बाधित कोविड केअर सेंटर मधून परस्पर निघून गेल्याने इतरांना कोरोना संसर्गाची बाधा झाली. त्यामुळे या बाधितावर व संबंधित कुटुंबियांवर नगरपालीका प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाधित हा अमरावती वरून एका खाजगी वाहनाने गडचांदूर शहरात दाखल झाला. त्यानंतर तो स्वतःची कोरोना तपासणी करिता सावित्रीबाई फुले महाविद्यालय, गडचांदूर येथे असलेल्या कोविड केअर सेंटर येथे पोहचला. परंतु आरोग्य विभागाच्या कर्मच्याऱ्यांना स्वत:चा योग्य पत्ता, दूरध्वनी क्रमांक न देता तसेच त्याठिकाणी न थांबता आरोग्य विभागाला व नगर परिषदेला कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर नातेवाईकाकडे निघून गेला. तसेच सदर बाधिताने त्याचदिवशी परिसरातील नागरिकां समवेत भोजन कार्यक्रमात सहभागी झाला. या कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्वांची कोविड-19 ची तपासणी करण्यात आली असून सर्व नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.

गडचांदूर शहरामध्ये नगर परिषदेद्वारा संस्थात्मक विलगीकरनाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु सदर नागरिक कोविड केअर सेंटर मधून परस्पर निघून गेल्याने इतरांना कोरोना संसर्गाची बाधा झाली. त्यामुळे सदर इसमावर व त्याच्या नातेवाईकावर माहिती लपविणेस्थानिक प्रशासनाची दिशाभूल करणे या अंतर्गत साथरोग  प्रतीबांधक कायदा 1867 व आपत्ती  व्यवस्थापन अधिनियम  2005 (51-ब ) , भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 269271 290 या अंतर्गत एकूण 3 व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             या पूर्वी औरंगाबाद ते नागपूर ते गडचांदूर आलेल्या कोरोना बाधित व्यक्तीच्या कुटुबियांवर स्थानिक प्रशासनाची दिशाभूल करण्याकरिता गुन्हा दाखल करण्यात आला होता.

0000000

No comments:

Post a Comment