Search This Blog

Sunday 26 July 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 403

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 403
248 कोरोनातून बरे 155 वर उपचार सुरु
चंद्रपूर दि. 26 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची शनिवारची 396 संख्या रविवारी सायंकाळपर्यंत 403 वर पोहोचली आहे.जिल्हयात कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 248 झाली असून गेल्या चोवीस तासात आज 28 बाधितांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या 155 बाधितावर उपचार सुरू आहे.
जिल्ह्याचा डब्लिंग रेट सध्या 15.3 आहे. आतापर्यंत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 102 रुग्ण आढळून आले आहे. तर जिल्ह्यातील बल्लारपूरवरोराराजुराभद्रावती,ब्रह्मपुरीकोरपनानागभिडगडचांदूर या शहरांमध्ये 140 रूग्ण आढळून आलेले आहे. ग्रामीण भागात ही रुग्णसंख्या 157 आहे.
रविवारी सकाळपासून पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील बापुजी नगरबालाजी वार्डयेथील 30 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. हा कुंटुबातील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातून पुढे आला आहे.
मुल येथील राईस मिल मधील बिहार मधून आलेल्या कामगारांचे पॉझिटिव्ह अहवाल पुढे येणे सुरूच आहे. रविवारी राईस मिल मधील बिहार येथील चार नागरिकांसह यांना वैद्यकीय सोयी सुविधा पुरविणाऱ्या 37 वर्षीय कर्मचारी देखील संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. एकूण 5 नागरिक पॉझिटिव्ह ठरले आहे.
राज्य राखीव दलाच्या पोलीस कंपनीतील आज पुन्हा एका जवानाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 33 वर्षीय पोलीस जवानाचा अहवाल आज पॉझिटिव्ह असून आतापर्यंत 31 जवान पॉझिटीव्ह ठरले आहे.
मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील नवेगाव येथील रहिवासी असणारा एक 26 वर्षीय कामगार पॉझिटिव्ह ठरला आहे. सिकंदराबाद येथून रेल्वेने या कामगाराने प्रवास केला होता. सावली येथे संस्थात्मक अलगीकरणात असताना या कामगारांचा स्वॅब घेण्यात आला तो पॉझिटिव्ह ठरला आहे.
जटपुरा गेट येथे फुलांचा व्यवसाय करणाऱ्या28 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या युवकाचा संपर्क शहरातील अन्य एका पॉझिटिव्ह बाधिताशी आला होता.
00000

No comments:

Post a Comment