Search This Blog

Tuesday, 14 July 2020

वायगाव येथे नवीन रास्त भाव दुकान सुरू


वायगाव येथे नवीन रास्त भाव दुकान सुरू
3 किलोमीटर अंतरावरील नागरिकांची पायपीट थांबणार
चंद्रपूर,दि. 14 जुलै: चंद्रपूर तालुक्यातील वायगाव येथे जिल्हा पुरवठातालुका पुरवठा कार्यालयाच्या पुढाकाराने नवीन रास्त भाव दुकानाला मंजुरी देऊन सुरु करण्यात आले आहे. वायगाव हे ताडोबा बफर क्षेत्रात येत असून घनदाट जंगलांने वेढलेले आहे. तीन किलोमीटर अंतरावरील निंबाळा या गावातून नागरिकांना धान्य घ्यावे लागत होते. नवीन रास्त भाव दुकान सुरू झाल्याने अन्नधान्य घेण्यासाठी नागरिकांची पायपीट आता थांबली आहे.
नवीन रास्त भाव दुकानाचा शुभारंभ दिनांक 12 जुलै रोजी सरपंच उमाकांत सुर्तीकरपुरवठा निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव श्री.तुरे, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.
नवीन रास्त भाव दुकान सुरू झाल्याने धान्य घेण्यासाठी सुलभ झाले असून इतर ठिकाणी धान्य घेण्यासाठी जाणारा वेळ वाचणार आहेअसे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले.
00000

No comments:

Post a Comment