Search This Blog

Tuesday, 21 November 2023

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील तपशील दुरूस्तीसाठी विशेष शिबिर

 

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील तपशील दुरूस्तीसाठी विशेष शिबिर

Ø 25 व 26 नोव्हेंबर रोजी सर्व मतदान केंद्रावर आयोजन

चंद्रपूरदि. 21 :1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर 71-चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या नागरिकांची नावे नोंदविणेमतदार यादीतील मय्यत मतदारांचे नाव कमी करणे तसेच मतदार यादीत नावाच्या चुकापत्ता व आधार जोडणीबाबत विशेष मतदार शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

या शिबिराचे आयोजन दि.25 व 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर करण्यात आले आहे. तरीसर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजवावाअसे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी केले आहे. 

000000

No comments:

Post a Comment