नियमानुसार व गटाच्या मागणीनंतरच मानव विकास कार्यक्रमांतर्गत बचत गटातील महिलांना योजनेचा लाभ
Ø कृषीपयोगी उपकरण व मळणी यंत्राकरीता अर्थसहाय्य उपलब्ध
चंद्रपूर, दि. 9 : महिला आर्थिक विकास महामंडळ(माविम),चंद्रपूरकडून मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिवती तालुक्यातील भुरे येसापुर येथे सन 2021-22 मध्ये मंजूर योजना स्वयंसहाय्य महिला बचत गटातील महिलांना कृषीपयोगी उपकरण, मल्टी क्रॉप थ्रेशर (मळणी यंत्र) करीता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.
सर्वोदय लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) गडचांदूर अंतर्गत मंजूर योजनेतील मळणी यंत्राकरीता लाभार्थी गटाकडून मागणी घेण्यात आली होती. भुरे येसापुर येथील भीमदेव महिला बचत गटाने दि. 5 ऑगस्ट 2022 रोजी मळणी यंत्र योजनेकरीता ठराव घेऊन सर्वोदय लोकसंचालित साधन केंद्र, गडचांदूर कार्यालयाकडे मागणी केली होती.
सीएमआरसी कडून सदर गटाला योजना मंजुरीचे आदेश दि.10 सप्टेंबर 2022 नुसार देण्यात आले होते. भीमदेव गटाचे साहित्य खरेदीनंतर 90 टक्के अनुदानाचे मागणी पत्र सीएमआरसी, गडचांदूर येथे प्राप्त झाले होते. सीएमआरसीने माविम जिल्हा कार्यालयाकडे अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार, प्रत्यक्ष गावात जाऊन साहित्याची मोका तपासणी करण्यात आली व सदर साहित्य प्राप्तीबाबत जिओ टॅगिंग फोटो काढण्यात आले होते.
तदनंतर, माविम कार्यालयामार्फत सीएमआरसीला अनुदानाची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली. आणि सीएमआरसीद्वारे गटाच्या खात्यावर सदर रक्कम वर्ग करण्यात आली आहे. नियमानुसार व गटाच्या मागणीनंतरच योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच गटाला साहित्य प्राप्त झाले असल्याचे जिओ टॅगिंगमधील गटाच्या अध्यक्ष आणि सचिवासह मोका तपासणीचे फोटो उपलब्ध आहे. गटाचे अनुदान मागणी पत्र व सविस्तर कागदपत्रे कार्यालयाकडे उपलब्ध असल्याचे माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment