Search This Blog

Friday, 17 November 2023

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा परिक्षेचे आयोजन

 

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा परिक्षेचे आयोजन

Ø आवेदनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2024

चंद्रपूरदि. 17 : आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कूल मध्ये प्रवेश घेण्यासाठी रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रवेशपूर्व स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

        सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणा-या व इयत्ता 7 वी ते 9 वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरून काढण्यासाठी सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी तसेच इयत्ता 6 ते 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित / आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळाजांबुळघाटता. चिमुर येथे प्रवेशपूर्व स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लक्ष रुपयांपेक्षा कमी आहेअशा प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांचे पालक / शिक्षक / मुख्याध्यापक यांनी सविस्तर माहिती व परीक्षा आवेदन पत्रासाठी नजीकच्या शासकीय आश्रमशाळाअनुदानित आश्रमशाळा येथील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालयचिमूर येथे संपर्क करावा. आवेदनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2024 आहे.  चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील अनुसूचित जमाती व आदिम जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घ्यावाअसे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचिमूरचे प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment