चंद्रपूर, दि.28 जानेवारी- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात बांधण्यात येत असलेल्या चिचडोह बॅरेजमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 11 हजार 510 हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील 28गावांतील 5 हजार 580 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
चिचडोह बॅरेजला 2008-09 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. 28272.86 लाख रुपये खर्चून हा बॅरेज बांधण्यात येणार आहे. या बॅरेजचे काम प्रगतीपथावर असून लवकरच या बॅरेजचे लोकार्पण होणार आहे. या योजनेमुळे कोणतेही गावठाण बाधित होत नसल्याने पुनर्वसनाची गरज नव्हती. त्यामुळे विनाअडथळा या बॅरेजचे काम गतीने सुरू आहे. 2011 पासून या बॅरेजच्या कामाला सुरुवात झाली. कॉक्रिंट बॅरेजच बांधकाम तसेच द्वार उभारणीचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत 5.85 मीटर उंची एवढा पाणीसाठा करण्यात आला आहे. मार्च 2019 पर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रस्तातिव असून, काम अंतिम टप्प्यात आहे.
No comments:
Post a Comment