Search This Blog

Saturday 19 January 2019

गरिबांना उत्तमोत्तम उपचार देण्यासाठी शासन प्रयत्नशील : ना.हंसराज अहीर



चांदा क्लबवरील रोगनिदान,उपचार महामेळाव्याची सागंता
दोन दिवसात 8 हजार रुग्णांवर उपचार व तपासणी

                चंद्रपूर दि. 18 जानेवारी –देशातील  गरीबांना उत्तमोत्तम  उपचार अगदी मोफत, सुलभ व सहज मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित आरोग्य मेळाव्याने अनेक रुग्णांना आरोग्याच्या योजना, उपचार पध्दती व उपचार सोयी प्राप्त झाल्याबद्दल केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आनंद व्यक्त केला. दोन दिवसात 8 हजाराच्या जवळपास रुग्णाना या मेळाव्यातून मोफत उपचार देण्यात आले.
           18 जानेवारीला या मेळाव्याची सांगता झाली. या समारोपाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर  उपस्थित केंद्रिय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर, महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपमहापौर अनिल फुलझेले, समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.बी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे तसेच चंद्रपूर शहरातील तज्ञ व नामावंत डॉक्टर मंडळी उपस्थित होते.
                 या दोन ‍दिवसीय महामेळाव्यात 8 हजार रुग्णांची नोंदणी  करण्यात आली असून त्यांच्यावर वेगवेगळया आजाराची मोफत तपासणी करुन उपचार करण्यात आले.  मधुमेह ग्रस्त बालकांना उत्तम प्रतीचे ग्लुकोमिटर वाटप करण्यात आले असून मधुमेह आजारावर उपचार भरपूर आहेत. पण गरीब व सर्वसाधारण कुटुंबातील जनतेसाठी ते खुब खर्चीक आहे. त्यामुळे गरिबी संपावयाची असेल तर सर्वांना औषधोपचार मिळाला पाहिजे असे  ना.अहीर यांनी यावेळी स्पष्ट केले.   
               यावेळी विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल डॉ.एम.जे.खान यांचा गुणगौरव करण्यात आला असून या आरोग्य मेळाव्याला सहकार्य केलेल्या सर्व डॉक्टर मंडळीचा सुध्दा सन्मान करण्यात आला. तसेच चंद्रपूर येथे  50 वर्षापासून प्रदीर्घ सेवा देणा-या डॉक्टरांचा  शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देवून गौरव करण्यात आला.  
               शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग या सर्व विभागांनी या आरोग्य मेळाव्याला विशेष सहकार्य केल्याबद्दल ना.हंसराज अहीर यांनी सर्वांचे आभार मानले.
                                                            000  

No comments:

Post a Comment