Search This Blog

Sunday 6 January 2019

मुद्रा, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व आवास योजनांवर लक्ष वेधा: ना.हंसराज अहीर


दिशा समितीमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या योजनाचा आढावा
11 ते 15 कृषी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 5 जानेवारी - केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना ,प्रधानमंत्री आवास योजनाकौशल विकास योजनाउज्वला गॅस योजनादीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना,राष्ट्रीय कृषी विकास योजनाप्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदी योजनांनी गती देण्याचे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज येथे केले.
बचत साफल्य भवनमध्ये आयोजित जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी आज केंद्रातील वेगवेगळ्या योजनांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र योजनाराष्ट्रीय आरोग्य अभियान, मुद्रा योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाल अंत्योदय योजनादीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनाप्रधानमंत्री ग्रामसडक योजनाप्रधानमंत्री आवास योजनानॅशनल सोशल असिस्टंस प्रोग्रामप्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणस्वच्छ भारत मिशनड्रिंकिंग वॉटर प्रोग्राम,प्रधानमंत्री कृषी योजना, डिजिटल इंडियासर्व शिक्षा अभियान एकात्मिक बाल विकास योजना, मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना आदी योजनांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला.
आढावा बैठकीला  आमदार नानाभाऊ शामकुळेमहापौर अंजलीताई घोटेकरजिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनारमहानगरपालिका आयुक्त संजय काकडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुलेकृषी सभापती अर्चनाताई जीवतोडेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदींची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये सर्वप्रथम जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सिकलसेल आजाराबद्दल चर्चा झाली. या आजाराच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेता या आजारातील रुग्णाला अपंगाचा दर्जा देण्याबाबतही चर्चा झाली. त्यानंतर पाणीपुरवठा योजनांवर चर्चा झाली. जिवती व दुर्गम भागामध्ये मोठ्या प्रमाणात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असून या भागामध्ये आरो मशीन देण्याबाबत मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. जिल्ह्याच्या सर्वदूर भागात आरो मशीनचे जाळे तयार व्हावे व ज्या भागांमध्ये दूषित पाणी आहेत्याठिकाणी ग्रामस्थांना आरो मशीन लावून मिळावीअशी मागणीही यावेळी प्रामुख्याने करण्यात आली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या मुद्रा योजनेवर आजच्या सभेमध्ये चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेचे सभापती व पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागांमध्ये बँकांकडून या योजनेसाठी योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केली. यावर बोलतांना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी बँकेत येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांची नोंद झाली पाहिजे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप होत आहे. मात्र बँकांची जी अडचण आहे ती देखील लाभार्थ्यांनी समजून घ्यावी. योजनेमधील लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी नियमित कर्ज फेड केल्यास अन्य लोकांना लाभ देण्याची व्याप्ती निश्चितच वाढेलअशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मनरेगा योजनेतील कामावर असणाऱ्या कामगारांना 90 दिवसाचे जॉब कार्ड देण्याबाबत नियमितता असावी. या सर्व कामगारांना बांधकाम कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा देणे शक्य आहे. याबाबतही सहानुभूतीपुर्वक विचार व्हावाअसे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
जिल्ह्यातील कौशल्य विकास विभागाचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. दीनदयाल उपाध्याय कौशल विकास योजनेतून किती लोकांची नोंद करण्यात आली व प्रशिक्षण देण्यात आले. यासंदर्भातही पदाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण सुरू असून यामध्ये 1200 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले.  680 लोकांना नोकरी मिळाल्याचे माहिती कौशल्य विकास विभागाकडून देण्यात आली. आतापर्यंत 488 बेरोजगारांनी स्वयंरोजगाराची कास धरल्याचे ही यावेळी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेबाबतचा आढावाही या ठिकाणी घेण्यात आला. प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या बाबत अतिशय सकारात्मक दृष्टिकोन अवलंबला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवास योजनेचा लाभ सर्व बेघरांना मिळावाअसे निर्देश यावेळी अहिर यांनी दिले.
आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी ग्रामपंचायत स्तरावर केंद्र व राज्य शासनाच्या योजना बाबतचे माहिती फलक लावण्यात यावे. या मागणीचा पुनरुच्चार केला. ग्रामीण भागातील जनतेला केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अद्यापही माहिती नाही. त्यामुळे जिल्ह्यामध्ये प्रमुख योजनांमध्ये लाभार्थी दिसून येत नाही. त्यामुळे या योजनांची प्रसिद्धी करण्याबाबतही त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना सुचविले.         
 शहरी व ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजनेचाही आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी बोलताना अहीर यांनी येत्या 20 जानेवारीपर्यंत पंधराशे लाभार्थ्यांना पट्टे मिळतीलअसे स्पष्ट केले. महानगरपालिकेतर्फेही यावेळी शहरी आवास योजने मध्ये प्राप्त झालेले अर्ज व देण्यात आलेले गृहकर्ज याबाबतची माहिती देण्यात आली.
यावेळी उज्वला गॅस योजनेचा आढावा देखील घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये सध्या 87 हजार 744 जोडण्या असून जिल्ह्यातून मोठया संख्येने जनतेकडून मागणी होत असल्याचेही यावेळी संबंधितांनी स्पष्ट केले. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विद्युतीकरण व अन्य पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
                                                  0000

No comments:

Post a Comment