Search This Blog

Thursday 28 January 2021

31 जानेवारी रोजी पल्स पोलीओ रविवार


 31 जानेवारी रोजी पल्स पोलीओ रविवार

पोलीओच्या समुळ उच्चाटनासाठी बालकांना पोलीओ डोज द्या

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे नागरिकांना आवाहन

 

चंद्रपूर, दि. 28 :  पोलीओचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता 31 जानेवारी 2021 रोजी पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेची राबविण्यात येत आहे. या दिवशी 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना बुथवर पोलीओ लस पाजण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या बालकांना पोलीओ लस देवून या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीसकलमी सभागृहात जिल्हा शिघ्र कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदीप गेडाम, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान एक याप्रमाणे 2052 लसीकरण केंद्रे व शहरी भागात 187 तर महानगरपालीका क्षेत्रात 317 अशी एकुण 2556 लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात करण्यात आली आहेत. या व्यतीरीक्त प्रवासात असलेल्या बालकांना, स्थलांतंरीत होत असलेल्या बालकांना व निवासाची व्यवस्था नसलेल्या बालकांना पोलीओ लस मिळावी याकरीता 84 मोबाईल टिम ग्रामीण भागात व शहरी भागात 13  व महानगर पालीका क्षेत्रात 19 अशा एकुन 116 मोबाईल युनिट टिमची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय टोलनाका, बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, यात्रास्थळे या ठिकाणीसुध्दा  ट्राझिंट टिमव्दारे लसीकरणाची व्यवस्था केलेली आहे.

या मोहिमेकरीता ग्रमिण विभागाकरीता 4658 व शहरी विभागाकरीता 462 व महानगर पालीका क्षेत्राकरीता 951 असे एकुन 6071  कर्मचारी नियुक्त केले असुन पर्यवेक्षणाकरीता  ग्रामिण विभागाकरीता 420 व शहरी विभागाकरीता 33 व महानगर क्षेत्राकरीता 63 असे एकुन 516 पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे.

राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेअंतर्गत भारत देश संपूर्ण पोलीओ मुक्त करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. भारत देश लवकरात लवकर पोलीओ मुक्त व्हावा, भारतात पुढील काही वर्षात एकही पोलीओग्रस्त रुग्ण आढळणार नाही, असा उदे्श समोर ठेवून दरवरर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.

पोलीओ रोगाचे निर्मुलन करण्याचे हेतुने भारत सरकार 1995 पासुन पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबवित आहे. तसेच नियमित लसीकरण, ए.एफ.पी. सर्व्हेक्षण व पोलीओ रुग्ण आढळल्यास मॉप अप रॉउंड याव्दारे पोलीओ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. देशात जानेवारी 2011 नंतर अद्यापपर्यंत पोलीओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. पोलीओ  निर्मुलन कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासुन प्रथमच अशा पध्दतीने यश मिळालेले आहे. जानेवारी 2014 मध्ये भारत देशास पोलीओ निर्मुलन प्रमाणपत्र मिळाले आहे.

000

No comments:

Post a Comment