Search This Blog

Sunday 31 January 2021

पोलीओचे रुग्ण भारतात आढळून येत नाही हा देशासाठी गौरव - जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले

 

पोलीओचे रुग्ण भारतात आढळून येत नाही हा देशासाठी गौरव 

- जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले

                                              

 पल्स पोलिओ मोहिमेचे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

 

चंद्रपूर, दि. 31 : जिल्ह्यात जिल्हा आरोग्य प्रशासनाचे वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहिम कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद, अध्यक्षा संध्या गुरनुले यांचे अध्यक्षतेखाली  व शुभहस्ते जिल्हा सामान्य रुग्णालय येथील पोलिओ बुथवर बालकास पोलिओ डोज पाजुन शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,  मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले  प्रमुखस्थानी  उपस्थित होते. सोबत डॉ.राजकुमार गहलोत ,जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.चंद्रपूर, डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, सा. रु.चंद्रपूर, डॉ. सोनारकर, वैद्यकिय अधिक्षक, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, चंद्रपूर  डॉ. हेमचंद कन्नाके, निवासी वैद्यकिय अधिक्षक बाहयसंपर्क , सा. रु. चंद्रपूर डॉ. राहुल भोंगळे, बालरोग तज्ञ, डॉ धवस, जनरल फिजीशीयन, उपस्थित होते.

 

यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष   संध्याताई गुरनुले  यांनी भारत  देशात पल्स पोलीओची  मोहिम  सुरुवातीपासुन उत्कृष्टपणे राबविण्यात आली,  त्यामुळे आजघडीला एकही पोलीओचा रुग्ण भारतात आढळून येत नाही  ही देशासाठी  गौरवाची  बाब आहे, असे सांगीतले. परंतु अजुनही आपल्या आसपासच्या देशात पोलीओचे रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे पोलीओचे समुळ उच्चाटनाकरीता  ही मोहिम राबविण्यात येत आहे.  सुदृढ बालके ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्यांच्या आरोग्याकडे नियमित लक्ष देने गरजेचे आहे व त्यामुळेच बालके निरोगी राहण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. याकरीता केंद्र व राज्यशासनातर्फे 31 जानेवारी या दिवशी पोलीओ मोहीम संपुर्ण भारतात एकाच वेळी राबविण्यात येत आहे. तरी संपुर्ण भारत पोलिओ मुक्त होने करीता सदर मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनतेला केले. यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी देखील बालकास पोलिओ डोज पाजला.

 

तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,  मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनीसुध्दा पोलीओ मोहिमचे महत्व यावेळी विशद केले व पालकांनी आपल्या बालकांना पोलीओ डोज द्यावा असे आवाहन केले. तसेच डॉ.राजकुमार गहलोत यांनी आपले प्रास्ताविकपर मार्गदर्शनात पल्स पोलीओ लसीकरणाबाबत वितृत माहिती यावेळी दिली.

 

सदर कार्यक्रमाचे संचालन डॉ. गजानन राउत, जिल्हा आयुष अधिकारी, यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेकरीता  जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे सुभाष सोरते, आर्टीस्ट , श्रीमती छाया पाटील पीएचएन, श्रीमती चंदा डहाके, एएनएम, शोभा भगत, पीएचएन व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

 राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिमेप्रसंगी जिल्ह्यात शहरी ,ग्रामीण भागात बालकांना पोलिओ डोज पाजण्यात येत आहे. व ज्या बालकांना अनवधानाने पोलीओ डोज मिळालेला नाही त्यांचेकरीता दिनांक 1 ते 3 फेब्रुवारी पर्यंत ग्रामीण भागात  व 5 फेब्रुवारी पर्यंत शहरी भागात आय.पी.पी.आय. अंतर्गंत घरोघरी जाउन आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत पोलिओ डोज पाजण्यात येणार आहे. तरी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment