Search This Blog

Saturday 23 January 2021

गत 24 तासात 27 कोरोनामुक्त


 गत 24 तासात 27 कोरोनामुक्त

8 पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

 

Ø  आतापर्यंत 22,380 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 171

 

चंद्रपूर, दि. 23 :  जिल्ह्यात मागील 24 तासात 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 8 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 936 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 380 झाली आहे. सध्या 171 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 94 हजार 74 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 67 हजार 968 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

            आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहराच्या गणेशनगर तुकुम येथील 67 वर्षीय पुरूष व बाबुपेठ वार्ड येथील 70 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 385 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 349, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 13, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या आठ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील चार, चंद्रपूर तालुका एक, बल्लारपुर एक, नागभीड एक व इतर ठिकाणच्या एक रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment