भिसी नगरपंचायत स्थापनेवर आक्षेप आमंत्रित
चंद्रपूर, दि. 1 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी ता. चिमुर या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी आणि उक्त क्षेत्रासाठी भिसी नगरपंचायत या नावाने नगरपंचायत गठीत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातर्फे 29 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाद्वारे प्राथमिक उद्घोषणा प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर उद्घोषणेबाबत ज्या व्यक्तींना आक्षेप नोंदवायचा असेल त्यांनी ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत जिल्हाधिकारी, चंद्रपूर, यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करावी, असे नगर विकास शाखेचे जिल्हा प्रशासन अधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment