Search This Blog

Thursday 7 January 2021

अवैध सावकारावर जिल्हा उपनिबंधकांची धाड

 अवैध सावकारावर जिल्हा उपनिबंधकांची धाड

चंद्रपूर, दि. 7 जानेवारी : महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमानुसार सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांचे मार्गदर्शनाखाली डि.यु.शेकोकार, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चंद्रपुर यांचे पथकाने प्राप्त तक्रारीनुसार अवैध सावकार श्रीमती गायत्री गुलाबराव गिरडकर रा. शेन्डे लेआऊट रामनगर,चंद्रपुर यांचे राहते घरी दिनांक दि. 6 जानेवारी रोजी धाड टाकली. याप्रसंगी सदर पथकाने शोधकार्य, झडती घेतली असता अवैध सावकारी संबंधाने आक्षेपार्ह कागदपत्रे दस्ताऐवज आढळुन आले.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या कागदपत्रे दस्ताऐवज नुसार पुढील चौकशी करुन संबंधित अवैध सावकारावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम 39 अन्वये कारवाई करण्यात येईल. सदर कामी सहकार विभागातील सहाय्यक निबंधक डि.यु.शेकोकार, एम.डी.मेश्राम, डि.एस.नंदनवार टि.डी.सरपाते. यु.एस.देवगडे. एस.पी.येवले, पी.डब्लु. भोयर, एस.टी. गौरखेडे, प्रकाश तुळणकर, सोनल भलमे यांनी कार्यवाही पार पाडली. तसेच चंद्रपुर जिल्ह्यामध्ये अवैध सावकारी संबंधाने तक्रारी असल्यास संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था अथवा या कार्यालयास सुचित करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक खाडे यांनी केले आहे.

000

No comments:

Post a Comment