Search This Blog

Friday, 18 October 2019

प्रत्येक बुथची वैयक्तिकरित्या तपासणी करावी: अमित चंद्रा


चंद्रपूरदि. 17 ऑक्टोबर: निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त परिस्थिती पार पाडाव्या करिता मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदान केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन वैयक्तिकरित्या त्याची तपासणी करावीअसे निर्देश पोलीस निवडणूक निरीक्षक अमित चंद्रा यांनी सर्व पोलीस स्टेशन ठाणेदारांना दिले. दिनांक 16 ऑक्टोबर 2019 रोजी राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या भेटीदरम्यान निवडणूक व्यवस्थेचे निरीक्षण करताना त्यांनी सूचना केल्या.
पोलीस निवडणूक निरीक्षक अमित चंद्रा यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघाला भेट देऊन तेथील ठाणेदार आणि राजुरा उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली. या बैठकीत नक्षलग्रस्त क्षेत्रातील मतदान केंद्र तसेच दुर्गम भागातील मतदान केंद्र संदर्भातील सुरक्षा व दळणवळणाची व्यवस्था याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी सर्व बुथची ठाणेदारांनी वैयक्तिक रित्या तपासणी करावीअसे निर्देश त्यांनी यावेळी दिले. सोबतच त्यांनी उपविभागीय कार्यालयातील नियंत्रण कक्षाला भेट दिली. तसेच मतदानाच्या दिवशीची व्यवस्था व ईव्हीएम मशीन मशीनचे वाहतूकीची सुरक्षा यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या. तसेच दीक्षाभूमी रॅली रोड येथेही त्यांनी भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी बेकायदेशीर बॅनर काढून टाकण्याच्या सूचना फिरत्या तपासणी पथकाला दिल्या.
00000

No comments:

Post a Comment