Search This Blog

Monday, 21 October 2019

86.25 टक्के दिव्यांग मतदारांनी केले मतदान


ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांना पुरवल्या विशेष सुविधा
चंद्रपूरदि. 21 ऑक्टोबर: चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्रासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. जिल्ह्यातील  दिव्यांग बांधवांनी यात उस्फुर्त सहभाग घेतला असून 86.25 टक्के दिव्यांग बांधवांनी मतदान केले आहेअशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
जिल्ह्यातील दिव्यांग मतदार, 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकगर्भवती स्त्रियाप्रसूत स्त्रिया या मतदाराकरिता जिल्हा परिषदेमार्फत अनेक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये व्हीलचेअरअंध मतदाराकरिता ब्रेल बॅलेट पेपरअंशतः अंध मतदान करिता मॅग्नेफाईन शीटपिण्याचे पाणीवाहन व्यवस्था इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या मदतीकरिता स्वयंसेवक नेमले होते. 7 हजार 639 दिव्यांग बांधवांनी याला उत्कृष्ट प्रतिसाद देत 86.25 टक्के मतदान केले. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी अनेक मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी दिल्यात. त्यावेळी मतदानासाठी आलेले दिव्यांग बांधव तसेच मतदारांशी त्यांनी संवाद साधला.

No comments:

Post a Comment