Search This Blog

Friday 18 October 2019

मतदान केंद्रावर पोहचण्यास दिव्यांग व वृद्ध व्यक्तींसाठी मनपातर्फे वाहनांची उपलब्धता

चंद्रपूर १७ ऑक्टोबर - आगामी विधानसभा  निवडणुकीकरिता -2019 करीता ७१ चंद्रपूर विधानसभा मतदार संघात २१ ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक पात्र  मतदारांनी आपला मतदान हक्क बजावलाच पाहिजे याकरीता निवडणूक आयोग व  जिल्हा प्रशासनाद्वारे मतदान जनजागृती मोहीम राबविल्या जात आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दिव्यांग मतदार, ८० वर्षांपुढील जेष्ठ नागरीक, गर्भवती स्त्रिया यांना मतदानाच्या दिवशी  मतदान केंद्रावर सुलभतेने पोहचता यावे याकरीता चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे विशेष वाहनांची सोय करण्यात आलेली आहे.  
  विधानसभा निवडणूकीसाठी दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी येणाऱ्या सर्व संभाव्य अडचणी लक्षात घेऊन त्यांना परिपूर्ण सुविधा उपलब्ध करुन देणे, तसेच मनपा हद्दीतील मतदान केंद्रात एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता मनपातर्फे घेण्यात येत आहे. त्यानुसार मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांकरिता व्हील चेअर, रॅम्पची व्यवस्था, शौचालय, पिण्याचे पाणी व इतर सुविधा मनपातर्फे उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
   मतदानाच्या धामधुमीत दिव्यांग, ८० वर्षांपुढील जेष्ठ नागरीक, गर्भवती स्त्रिया या मतदारांकडे दुर्लक्ष होते त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी दिसून येते. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांग व जेष्ठ नागरिक यांची नोंदणी व त्यांचे मतदान याकडे विशेष लक्ष दिले आहे. या मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार अपंग मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी रँप, व्हीलचेअर आणि स्वयंसेवक यांची सोय करण्यात आली आहे. या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असून त्यासाठी कोणत्या मतदान केंद्रावर किती दिव्यांग मतदार आहेत याची स्वतंत्र यादी मनपातर्फे तयार करण्यात आली आहे.

 दिव्यांग मतदारांकरीता वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असून याकरीता प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय मागणीनुसार मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दिव्यांग व वृद्ध व्यक्ती यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी मनपातर्फे दिलेल्या प्रभागनिहाय व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी व मतदान अवश्य करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

    प्रभागनिहाय समन्वयकांची नावे - प्रभाग क्र. १ ते ३ समन्वयक - रोशनी तपासे मोबाईल क्रमांक - ९०९६८९६५०८, प्रभाग क्र. ४ ते ६ समन्वयक - प्रकाश बांते  मोबाईल क्रमांक - ९९२१५०१५६२, प्रभाग क्र. ७ ते ९ समन्वयक - चिंतेश्वर मेश्राम  मोबाईल क्रमांक - ८९७५६११८३०, प्रभाग क्र. १० ते १३ समन्वयक - सुषमा करमनकर  मोबाईल क्रमांक - ९४२०१४२५१३, प्रभाग क्र. १४ ते १७ समन्वयक - पांडुरंग खडसे  मोबाईल क्रमांक - ९४२३४१७५३६      

दिव्यांगांसाठी ऍप
दिव्यांगांची मतदारनोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी निवडणूक विभागातर्फे पीडब्ल्यूडी हे ऍप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे मोबाईल ऍप डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या ऍपवर जाऊन मागणी केल्यास दिव्यांग मतदारांना प्रशासनामार्फत व्हीलचेअर तसेच मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment