Search This Blog

Monday 7 October 2019

मतदान चिठ्ठी वाटप नियोजन पद्धतीने पूर्ण करण्याचे निरीक्षकांचे निर्देश


  •  निरीक्षकांनी घेतला 6 विधानसभा क्षेत्रांचा आढावा
  • 21 ऑक्‍टोबरचे मतदान प्रत्येकाच्या लक्षात राहील असा प्रचार करा
  •  प्रत्येक कर्मचाऱ्याचे पोस्टर बॅलेट  झाले पाहिजे
  • पोलीस दलाला कसून तपासणी करण्याचे निर्देश
  • सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश


चंद्रपूर दि. 6 ऑक्‍टोबर : 21 ऑक्टोबर हा मतदानाचा दिवस असल्याची माहिती या जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला झालीच पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रचार, प्रसाराचा वापर करतानाच मतदान चिठ्ठी वाटप अतिशय प्रभावीपणे व राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान केंद्र प्रतिनिधी मार्फत झाले पाहिजे, असे निर्देश केंद्रीय निरीक्षकांनी आज झालेल्या सर्व निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलेत.
         रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीमध्ये जिल्ह्यात दाखल झालेले निरीक्षक राघवेंद्र कुमार सिंग, गंगाधर बत्रा, अमित चंद्रा यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. राजुरा येथील निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कुंभेजकर, चंद्रपूर येथील निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर गव्हाड, बल्लारपूर येथील निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर, ब्रह्मपुरी येथील निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे, चिमूर येथील निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ, वरोरा येथील निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष शिंदे यावेळी उपस्थित होते. तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व अन्य अधिकारी देखील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
        या बैठकीमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी व आलेल्या अडचणी या संदर्भातील आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी निवडणुकीच्या संदर्भातील तयारीचा आढावा सादर केला. कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंत झालेले प्रशिक्षण तसेच जिल्ह्यामध्ये चंद्रपूर शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमाबाबतही माहिती त्यांनी दिली. यासोबतच प्रत्येक मतदारसंघातील सखी मतदान केंद्र ,पोस्टल बॅलेट, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण, त्यांना देण्याच्या सूचना, सुष्म निरीक्षकांची नियुक्ती, मतमोजणी केंद्रावरील उपायोजना, मतमोजणी यंत्राची सरळ मिसळ याबाबतचा आतापर्यंतचा अहवाल त्यांनी दिला.
         यावेळी मार्गदर्शन करताना राघवेंद्र कुमार सिंग यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचार प्रसिद्धीच्या मार्फत 21 ऑक्टोबर या मतदान दिनाच्या औचीत्याची माहिती गावागावांत पर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी निवडणूक कर्मचाऱ्यांनी घ्यावी. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर पुढील आठवड्यामध्ये त्या ठिकाणी होणारे मतदान मतदान केंद्र, अंतर्गत येणारी गावे, येणारे प्रभाग, गट याबाबतची माहिती दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले. जेणेकरून प्रचार व प्रसार होऊन मोठ्या प्रमाणात यावेळी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मतदान झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
      जिल्ह्यात कोणताही कर्मचारी, ड्युटीवर असणारे सुरक्षा रक्षक, इलेक्शन ड्युटीवर असणारे चालक, यापासून कोणीही निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित राहू नये, यासाठी बॅलेट पेपरची व्यवस्था करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. 21 ऑक्टोबरला नेमके काय आहे व आपला मताधिकार बजावतानाच जबाबदारी बजावणी देखील महत्त्वाचे असल्याचे नागरिकांमध्ये बिंबवण्याचे व स्वीप उपक्रम आणखी सक्रिय करण्याचे आवाहन केले. स्विपचे नोडल अधिकारी दिपेन्द्र लोखंडे यांनी देखील यावेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यात या काळामध्ये सोशल मीडियाच्या मार्फत काही समाजकंटकांकडून सामाजिक स्वास्थ्य बिघडणार तर नाही ना अशा पद्धतीच्या पोस्ट टाकल्या जात असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीने देखील या संदर्भात नियंत्रण ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.प्रत्येक गोष्टीबाबत उमेदवारांकडून परवानगी घेतली जाईल व ती त्यांना तातडीने मिळेल यासंदर्भातील यंत्रणा निवडणुकीच्या सर्व विभागांनी गतीशील करावी असेही त्यांनी शेवटी यावेळी स्पष्ट केले. सोबतच नागरिकांनी देखील निरीक्षकांचे नंबर जाहीर करण्यात आले असून त्यावर कुठलाही अडचण असल्यास संपर्क साधावा, तसेच दररोज अकरा ते बारा वाजता रामनगर येथील विश्रामगृहामध्ये नागरिकांना भेटण्यासाठी वेळ निश्चित केली असून या काळामध्ये आपल्या तक्रारी देण्याचे आवाहन केले आहे.
0000

No comments:

Post a Comment