Search This Blog

Thursday 17 October 2019

निवडणूक निरीक्षकांनी केली ईव्हीएम मशीनची तपासणी


चंद्रपूरदि. 16 ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्यात 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी दाखल झालेले निवडणूक निरीक्षक गंगाधर पात्रा यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2019 रोजी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राला भेट दिली. यादरम्यान त्यांनी मतदानाच्या दिवशी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनची तपासणी केली. यावेळी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी क्रांती डोंबे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी. याकरिता जिल्ह्यात दाखल झालेले मुख्य निवडणूक निरीक्षक गंगाधर पात्रा यांनी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचा भेट दिली. यादरम्यान त्यांनी ब्रह्मपुरी उपविभागीय कार्यालय येथे भेट देऊन ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनचे निरीक्षण सुरू असलेल्या निरीक्षण कक्षाला भेट देऊन मशीनच्या तपासणीचा आढावा घेतला. तसेच तपासणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना निरपेक्ष व भयमुक्त मतदान प्रक्रियेसाठी सर्वांनी काळजी घेऊन मशीनची तपासणी करावीअशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
0000

No comments:

Post a Comment