Search This Blog

Sunday, 13 October 2019

बेकायदेशीर बॅनर हटवा : अमित चंद्रा


चंद्रपूरदि. 12 ऑक्टोबर: चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेले पोलीस निवडणूक निरीक्षक अमित चंद्रा यांनी 12 ऑक्टोबर 2019 रोजी एसएसटी भेट दिली असता त्यांना काही ठिकाणी बेकायदेशीर बॅनर लावलेले दिसले. त्यावर त्यांनी तात्काळ कारवाई करून ते बॅनर लवकरात लवकर काढण्याच्या सूचना दिल्या.
विधानसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यात दाखल झालेले निवडणूक निरीक्षक अतिशय सक्रियतेने निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेत आहे. आज पोलीस निवडणूक निरीक्षक अमित चंद्रा यांनी चंद्रपूर मतदारसंघातील नाकोडा येथील गंभीर मतदानकेंद्राला भेट दिली. तसेच वर्धा नदीच्या पुलावरील स्थायी निगराणी पथकाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना काही ठिकाणी बेकायदेशीररित्या लावलेले बॅनर आढळून आले. त्यावर त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच ते बॅनर लवकरात लवकर काढण्याचे काढण्याच्या सूचना दिल्या. बॅनर छापण्यासाठी निवडणूक विभागाने प्रकाशन प्रकाशक छापणे, बंधनकारक केले असून परवानगीशिवाय ते छापण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश आहेत.
00000

No comments:

Post a Comment