Search This Blog

Monday 7 October 2019

रांगोळी स्पर्धेद्वारे करण्यात आली मतदान जनजागृती स्वीप अभियानांतर्गत स्पर्धेचे आयोजन


चंद्रपूरदि. 5 ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून मतदान संदर्भात जिल्ह्यातील महिलांमधे जागृती घडवून आणण्यासाठी स्वीप अंतर्गत सरकार नगर येथे महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वीप’ अंतर्गत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न प्रशासन व निवडणूक आयोगातर्फे करण्यात येत आहे.
             मतदार जागृतीसाठी चंद्रपूर शहरात व जिल्ह्यात आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अनुषंगाने सरकार नगर परिसरात महिलांसाठी  रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून मतदार जागृतीसंबंधीच्या संदेशाचे विविध आकर्षक रांगोळींद्वारे रेखाटन केले.
विधानसभा निवडणुकीच्या मतदारांना मार्गदर्शन करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत शनिवारला चंद्रपूर शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मतदार जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला स्वीप मोहिमेचे नोडल अधिकारी ( शहर ) युधिष्ठीर रैच यांनी उपस्थित महिलांना  मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. भारतीय संस्कृतीत घरातील महिला कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी अविरत कार्यरत असते. ज्याप्रमाणे कुटुंबातील महिला त्या घराचा कणा असतो त्याचप्रमाणे भारतातील महिला भारतीय लोकशाहीचा कणा आहेत. त्यांच्या पुढाकाराने मतदान जनजागृती मोहिमेस बळ मिळणार आहे. महिलांनी स्वतः मतदान तर करावेच त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील तसेच आपल्या परिसरातील प्रत्येक मतदाराचे मतदान होईल याची काळजी घ्यावी. तसेच चंद्रपूर शहरातील मतदानाची टक्केवारी उर्वरित मतदारसंघापेक्षा कमी असून ही टक्केवारी वाढवण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात स्वीप मोहिमेचे नोडल अधिकारी ( शहर ) युधिष्ठीर रैच तसेच स्वीप टिमचे अधिकारी विशाल देशमुखसूर्यकांत भडकेश्री. भोयरपरिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0000000

No comments:

Post a Comment