Search This Blog

Sunday 13 October 2019

निवडणूक खर्च निरीक्षक यांची स्थायी तपासणी पथकाला भेट


चंद्रपूरदि. 12 ऑक्टोबर: राजूरा चंद्रपूर बल्लारपूर मतदारसंघाच्या निवडणूक खर्चाचा निरीक्षणासाठी दाखल झालेले निवडणूक खर्च निरीक्षक धृबाज्योती रॉय यांनी आज दिनांक 12 ऑक्टोबर 2019 रोजी एमईएल चंद्रपूर येथील स्थायी तपासणी पथकाला भेट दिली.
यादरम्यान त्यांनी पथकाच्या अधिकाऱ्यांची संवाद साधून अधिकारी करत असलेल्या तपासणीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. तसेच आढावा घेत असताना राबवत असलेल्या तपासणी प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. सोबतच पथकासमोर दाखल झालेल्या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी घ्यावीअशा स्पष्ट सूचना दिल्या.
00000

No comments:

Post a Comment