Search This Blog

Friday 11 October 2019

एकही पेड न्युज सुटू नये याची दक्षता घ्यावी : के विनोद कुमार


निवडणूक खर्च निरीक्षकानी घेतला एमसीएमसी समितीच्या कामकाजाचा आढावा
चंद्रपूरदि. ऑक्टोबर: निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही अनेक उमेदवारांकडून पेडन्यूजचा वापर केला जातो. त्या बातमीमध्ये तटस्थता राहत नसल्याने एकाच उमेदवाराचा प्रचार होतो. यावर नियंत्रण करण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीने प्रत्येक न्यूजचे बारकाईने निरीक्षण करावे. जेणेकरून एकही पेड न्युज सुटता कामा नयेअशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक के. विनोदकुमार यांनी दिल्या. आज दिनांक ऑक्टोबर 2019 रोजी प्रशासकीय भवन स्थित माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी भेट दिली.
यावेळी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा सखोल आढावा त्यांनी घेतला. यामध्ये उमेदवारांकडून प्रचार व प्रसिद्धी साधनांची प्रमाणीकरण प्रक्रियापोलीस विभागाचे  सायबर सेल आणि समितीच्या समन्वयातून सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरावर देखरेखइलेक्ट्रॉनिक मीडिया वरील बातम्यांचे परीक्षणस्थानिक न्यूज चॅनल तसेच राज्यस्तरीय न्यूज चॅनल वर प्रसारित करणाऱ्या बातम्यांचे परीक्षणपेडन्यूज निरीक्षण व पेड न्यूज सिद्ध झाल्यास समितीमार्फत करण्यात येणाऱ्या कारवाईची प्रक्रियाविविध वृत्तपत्रांच्या बातम्यांचे निरीक्षणचॅनेल्सवरील बातम्यांचे निरीक्षणवर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणेबातम्यांच्या कात्रणांचे वर्गीकरणजिल्ह्यात दाखल झालेल्या संपूर्ण निरीक्षकांचे प्रसिद्ध झालेल्या बातम्यानिवडणूक निरीक्षकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया उत्तम रीतीने पार पाडण्याकरिता केलेल्या कार्याच्या बातम्याजिल्ह्याच्या निवडणूक विभागामार्फत जनहितार्थ प्रसिद्ध झालेल्या बातम्यात्या सर्व कामकाजांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतलेला आढावा इत्यादी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या कामकाजाचा त्यांनी तब्बल एक तास आढावा घेतला.
            हा आढावा घेत असताना त्यांनी अनेक सूचना केल्या. त्यामध्ये वृत्तपत्रांच्या बातम्यांचे निरीक्षण करताना बातमीची वस्तुनिष्ठता तसेच तटस्थपणा तपासावा. उमेदवारांच्या सोशल मीडियाच्या खात्यावरून प्रसारित होणारे मजकूर तपासावे. राजकीय जाहिरातींची योग्य पूर्व प्रमाणीकरण करावे. पेडन्युजवर बारीक लक्ष ठेवून एकही पेड न्यूज सुटता कामा नये. पेड न्यूज सिद्ध झाल्यास तात्काळ यावर कारवाई करून संबंधित बातमीचा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करावाअशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तत्पुर्वी त्यांनी सी-व्हिजिल निवडणूक खर्च विभाग 1950 या निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या विभागांचा आढावा घेतला.
00000

No comments:

Post a Comment