Search This Blog

Friday, 11 October 2019

धम्मचक्र अनुप्रवर्तक महोत्सव निमित्ताने बैठक

चंद्रपूर, दि, 10 ऑक्टोबर: दिनांक 15 व 16 ऑक्टोबर 2019 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात धम्मचक्र अनुप्रवर्तक महोत्सव सुव्यवस्थित पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून दिनांक 5 ऑक्टोबर 2019 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
या बैठकीला उपजिल्हाधिकारी जे.पी. लोंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते, सहाय्यक अभियंता एस. एस. कापसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश दहिगावकर प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये दीक्षाभूमीच्या आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, साफसफाईची कामे, मोबाइल टॉयलेट, दिव्यांची व्यवस्था, परिसराची सफाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याच्या परिसरातील साफसफाई, अग्निशामक दलाचे,  नियोजन, विद्युत व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त आयोजित केलेल्या रॅलीचे व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त, स्वयंसेवकांची व्यवस्था, अन्नदान व्यवस्था, बंदोबस्त करिता दीक्षाभूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था, या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. तसेच चंद्रपुर महानगरपालिका आयुक्त, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चंद्रपूर, जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तसेच आयोजन समितीला नियोजन व व्यवस्थेसंदर्भात सूचना करण्यात आल्या.
000000

No comments:

Post a Comment