Search This Blog

Saturday 5 October 2019

मतदान करणे हा युवांचा हक्क व जबाबदारीही - डॉ. खेमनार


स्वीप अंतर्गत सरदार पटेल महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम
चंद्रपूर 4 ऑक्टोबर - अठरा वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे. यामुळे प्रत्येकाने आपल्या नावाची नोंद मतदार यादीत करावी व  मतदानाचा हक्क बजावणे हा युवांचा हक्क व जबाबदारीही असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी ४ ऑक्टोबर रोजी सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमा प्रसंगी केले. 
            विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  युवावर्ग व भावी मतदारांना मार्गदर्शन करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गुरुवारी सरदार पटेल महाविद्यालयात जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. मतदानाचा हक्क बजावण्यापासून महाविद्यालयीन विद्यार्थी लांब असतात. यामुळे स्विप योजनेंतर्गत मतदानाच्या हक्काबाबत मार्गदर्शन करण्यात आले. काही नवमतदार असल्याने मतदान कसे करावे आणि मतदान करणे का आवश्यक आहे याची त्यांना पुरेशी कल्पना नाही. यामुळे युवा मतदारांना मतदानाचा अधिकार व मतदान कसे करावे याची माहिती देण्यात आली.
            निवडणूक आयोगाने मतदानातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक ओळखपत्र तयार करण्याची विशेष मोहीम राबविली. मात्र अशा मोहिमेत शासनाचे काम’ अशा पद्धतीने याकडे लक्ष न देता देशाप्रतीचे महत्त्वाचे कर्तव्य म्हणून या मोहिमेस आपला सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. केवळ आपले ओळखपत्र करून न थांबता समाजातील इतरही घटकांना याविषयीची माहिती देण्यात सुजाण नागरिकांचा पुढाकार अपेक्षित आहे. महाविद्यालयातील युवक राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशा स्वरूपाचा जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबवू शकतात. यात मतदार जनजागृतीपर रॅलीप्रभात फेरीविविध स्वरूपाच्या स्पर्धा यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा सहभाग घेण्यात येतो. मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. अशा स्वरूपाची जागृती घडवून आणण्यासाठीच निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.मतदारजागृतीच्या प्रयत्नात युवांनी सहभागी व्हावे आणि मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानासाठी सज्ज व्हायला हवे.
            या कार्यक्रमासाठी नोडल अधिकारी निवडणूक जनजागृती कार्यक्रम स्वीप तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद दिपेंद्र लोखंडेसरदार पटेल कॉलेजचे प्राचार्य श्रीइंगोले चंद्रपूर, श्रीदेशमुख तसेच मोठ्या प्रमाणावर शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.  
0000

No comments:

Post a Comment