Search This Blog

Saturday 5 October 2019

जिल्ह्यात आणखी चार निवडणूक निरीक्षक दाखल

सकाळी 11 ते 12 दरम्यान नागरिकांना भेटता येणार
चंद्रपूरदि. ऑक्टोबर: 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगामार्फत नियुक्त केलेले मुख्य निवडणूक निरीक्षक व पोलिस निवडणूक निरीक्षक दाखल झाले आहे. निवडणुकी संदर्भात काही तक्रारी असल्यास नागरिकांना सकाळी 11 ते 12 दरम्यान भेटता येणार आहे. जिल्ह्यात एकूण सहा निवडणूक निरीक्षक दाखल झाले आहेत.
राजुरा व चंद्रपूर  विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक राघवेंद्र कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 9423936892 व 8821030521 आहे.
बल्लारपूर व ब्रह्मपुरी मतदार संघाकरिता गंगाधर पात्रा यांची निवडणूक निरिक्षक म्हणून निवडणूक आयोगामार्फत नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 9423938597 व 7821068983 आहे.
चिमूर व वरोरा मतदार संघाकरिता यु. डी. खान यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 9423938642 व 7821012610 आहे.
सोबतच पोलीस निवडणूक निरिक्षक म्हणून अमित चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 9423953127 व 7821077282 आहे.
यापूर्वी 28 सप्टेंबर 2000 19 रोजी राजूराचंद्रपूरबल्लारपूर या विधानसभा मतदारसंघाकरिता धृबाज्योती रे दाखल झाले होते. त्यांचा संपर्क क्रमांक 9423938642 व 7820885887 आहे. तसेच    ब्रह्मपुरीचिमूरवरोरा विधानसभा मतदारसंघासाठी के. विनोदकुमार यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9423938729 व 7820888992 आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीकरिता एकूण सहा निवडणूक निरीक्षक दाखल झाले असून या सर्वांचे रामबाग येथील वन विभागाच्या विश्रामगृहात वास्तव्य आहे. जिल्ह्यातील नागरिकांना निवडणुकीसंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास प्रत्यक्ष संपर्क करून किंवा वन विभागाच्या विश्रामगृहात प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार करता येणार आहे. प्रत्यक्ष भेट घेण्याची वेळ सकाळी 11 ते 12 दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.
000

No comments:

Post a Comment