Search This Blog

Saturday 19 October 2019

आज सायंकाळी 6 वाजेपासून प्रचारतोफा थंडावणार शांततापूर्ण मतदानासाठी प्रशासन सज्ज: जिल्हाधिकारी


·         चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारसंघात मतदान नोंदणी नसणाऱ्यांना जिल्हा सोडण्याचे आदेश
·       व्हाट्सअप फेसबुकवर प्रचार ठरेल आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन
·       20 व 21 तारखेच्या जाहिरातींचा मजकूर प्रमाणित करणे आवश्यक
चंद्रपूरदि. 18 ऑक्टोबर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 21 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून उद्या सायंकाळी वाजेपासून उमेदवारांकडून केला जाणारा प्रचार थांबणार आहे. मतदान करण्याची सर्वांना संधी प्राप्त व्हावी. याकरिता बाहेरील जिल्ह्यातील मतदारांना ज्यांची नोंदणी चंद्रपूर जिल्ह्यात नाही अशांना जिल्हा सोडण्याचे आदेश देण्यात येत आहेअसे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात दिनांक 18 ऑक्टोबर 2019 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
            चंद्रपूर जिल्ह्यातील 18 लाख 76 हजार 351 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 21 तारखेला होणारी मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात व्हावी. याकरिता केंद्रीय पोलीस दल तसेच निमलष्करी दलाची पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व भयमुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज सज्ज आहेअशी माहिती त्यांनी यावेळी दिली. दिनांक 19 ऑक्टोबर पासून जाहीर प्रचाराला बंदी घालण्यात आली असून उर्वरित  प्रचार साहित्य जसे की वृत्तपत्रांमधील प्रकाशित करण्यात येणाऱ्या जाहिराती व इतर माध्यमावरून प्रसारित करण्यात येणारे मजकूर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीमार्फत प्रमाणित करणे बंधनकारक आहे.
ग्रामीण मतदान केंद्राची संख्या 1441 तर शहरी मतदान केंद्राची संख्या 657 असे एकूण 2098 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये याकरिता 28 मतदान केंद्र सहाय्यकारी मतदान केंद्र म्हणून निर्माण केले गेले आहेत. या मतदान केंद्रापैकी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांना सखी मतदान केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या मतदान केंद्राची संपूर्ण व्यवस्था महिला अधिकारी सांभाळणार आहेत. अशी एकूण 12 मतदान केंद्रे सखी मतदार केंद्र जिल्ह्यात निर्माण करण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रियेला अवघे दिवस शिल्लक असून मतदान केंद्र शोधण्यास मतदारांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. याकरिता मतदार ओळख चिट्ठी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू असून आतापर्यंत 98 टक्के मतदारांना ओळखीची चिट्टीचे वितरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण हजार 639 दिव्यांग मतदारांशी संपर्क करण्यात आला असून त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोचण्यासाठी कोणतीही समस्या निर्माण होणार नाहीयासाठी पीडब्ल्यूडीचा वापर करून त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी वाहतूक सुविधा पुरवण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकगरोदर स्त्रिया यांनाही मतदान केंद्र पर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना मदत हवीअशा एकूण 16219 मतदारांचा शोध प्रशासनाने घेतलेला आहे. त्यांना तशी वाहतूक सुविधा पुरवण्यात येणार आहे.
उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक खर्च निरीक्षकांमार्फत विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे निवडणूक खर्च तब्बल वेळा तपासण्यात येणार असून आज तपासणीचा अंतिम दिवस आहे. आतापर्यंत निवडणूक खर्च सादर न केलेल्या 15 उमेदवारांना नोटीस बजावलेल्या आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर विधानसभा मतदारसंघावर राज्य निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष असून या मतदारसंघाची तसेच संपूर्ण जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढावी. यासाठी स्वीप अभियानाच्या माध्यमातून उद्या दिनांक 19 ऑक्टोबर 2019 रोजी चंद्रपूर शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी प्रत्येक मतदारसंघात मतदार बलून उभारले गेले आहे. रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या आहे. नवमतदारांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी 26 मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट वसवले जाणार आहे. तसेच या जनजागृतीमध्ये पत्रकारांचा मोठा वाटा असून मतदानासाठी तीन दिवस शिल्लक असताना माध्यमांनी मतदानाच्या जागृती करिता नेहमीसारखे विशेष सहकार्य करावेअशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान केंद्र सापडत नसेल तर 1950 या हेल्पलाइनवर संपर्क करावा. आतापर्यंत 1000 कॉल या हेल्पलाईनला प्राप्त झाले आहे. तसेच मतदारांच्या मदतीसाठी मराठी मध्ये मतदार मार्गदर्शकेची निर्मिती करण्यात आली आहेअशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
उद्या दिनांक 19 ऑक्टोबर 2019 च्या सायंकाळी वाजेपासून जाहीर प्रचार करणे थांबणार असून फेसबुक व्हाट्सअप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करणे ही आचारसंहितेचे उल्लंघन ठरणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून  बेकायदेशीररित्या प्रचार करणाऱ्यावर नोटीस बजावलेल्या आहेत. यावर प्रशासनाचे विशेष लक्ष असून मतदानाच्या दिवशी हॉटेलवर सुद्धा लक्ष राहणार आहे. यादरम्यान ओपिनियन कॉल प्रकाशित करणेही आचारसंहितेचे उल्लंघन ठरणार आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही पेडन्यूज प्रकाशित झाल्या असून त्यासंबंधीचे नोटीस उमेदवारांना पाठवलेले आहे. तसेच संबंधित पेडन्यूजचा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी 100 मीटर परिसरात कोणताही प्रचार करण्यावर बंदी असून उमेदवारांना प्रतिबंधित क्षेत्र व्यतिरिक्त तंबू उभारता येणार आहे. त्यामध्ये एक टेबल व दोन खुर्च्या यापेक्षा जास्त साहित्य आढळून आल्यास ते बेकायदेशीर ठरवून त्यावर कारवाई करण्यात येईल.
मतदानाच्या हक्कापासून कामगार व मजूरवर्ग वंचित राहू नये याकरिता जिल्ह्यातील सर्व खासगी तसेच सरकारी प्रतिष्ठानांशी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कामगार आयुक्त व खासगी प्रतिष्ठानच्या प्रमुखांना 21 ऑक्टोबर रोजी सुट्टी देण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात एकूण हजार 926 पोस्टल बॅलेटने मतदान होणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे मतदानाची टक्केवारी 66.27 एवढी होती. ही टक्केवारी वाढावी यासाठी चंद्रपूर शहरातील व्यावसायिक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले असून त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात आले आहे. व्यवसायिकांच्या माध्यमातून देण्यात येणारी सूट ही स्वयंसेवी आहे. त्यासाठी प्रशासन कोणतीही आर्थिक मदत करत नाही. म्हणून त्यांनी स्वयंप्रेरणेने केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच यावेळी जिल्ह्यातील सुजाण नागरिक चंद्रपूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता नक्कीच या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन सहकार्य करेल करेलअशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
00000

No comments:

Post a Comment