Search This Blog

Tuesday 15 October 2019

पोलीस निवडणूक निरीक्षकांनी केले संवेदनशील मतदान केंद्रांची तपासणी


चंद्रपूर, दि. 15 ऑक्टोबर: दिनांक 14 ऑक्टोबर 2019 रोजी पोलीस निवडणूक निरीक्षक अमित चंद्रा यांनी जिवती तालुक्यातील नक्षलग्रस्त भागातील संवेदनशील मतदान केंद्राला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातील जिवती तालुक्यातील मराईपाटणराहापल्लीपुनागडभैपठारभोकसापूरशेडवाही या मतदान केंद्रांना भेट दिली. येथील मतदान केंद्राची सुरक्षा, मोबाईल व फोन कनेक्टिव्हिटी, मतदार अधिकाऱ्यांची निवासस्थाने, वीज व्यवस्था यासंदर्भातील त्यांनी पाहणी केली या मतदान केंद्रावर काही आवश्यकता असला तात्काळ निवडणूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली. तसेच त्यांनी लकडकोड स्थायी निगराणी पथकाला भेट दिली. चेक पोस्ट वरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
00000

No comments:

Post a Comment