Search This Blog

Wednesday 23 October 2019

दिव्यांग ठरले लोकशाहीचे खरे शिलेदार

चंद्रपूर जिल्ह्यातील 95.71 टक्के दिव्यांगानी केले मतदान
चंद्रपूर, 22 ऑक्टोबर: चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग अचंबित करणारा ठरला. जिल्ह्यातील हजार 639 दिव्यांग मतदारांपैकी हजार 311 दिव्यांग बांधवांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचे तेच खरे शिलेदार ठरले. जिल्ह्यातील तब्बल 95.71 टक्के दिव्यांगानी मतदान केले. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव यांनी जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध सुविधा पुरवण्याचे नियोजन आखले होते. या नियोजनाला चंद्रपुर महानगरपालिका प्रशासनाचे सहकार्य लाभले. जिल्ह्यातील दिव्यांग मतदार, 80 वर्षावरील जेष्ठ नागरिकगर्भवती स्त्रियाप्रसूत स्त्रिया या मतदारांकरिता अनेक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये व्हीलचेअरअंध मतदाराकरिता ब्रेल बॅलेट पेपरअंशता अंध मतदाराकरिता मॅग्नेफाईन शीटपिण्याचे पाणीवाहन व्यवस्था इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या मदतीकरता स्वयंसेवक नेमले होते. निवडणूक आयोगामार्फत  प्रशासनाने पुरलेल्या या सुविधांना दिव्यांग बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला व दिव्यांग मतदारांची टक्केवारी 95.71 पर्यंत पोहचवली. त्यामध्ये विधानसभा क्षेत्रातील अस्थिभंग असलेले हजार 149 मतदार, 803 अंध मतदार, 433 अंशता अंध मतदार, 1926 इतर दिव्यांग मतदार यांनी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला.
            तसेच 16 हजार 291 दिव्यांग मतदारगर्भवती स्त्रियाप्रसुत स्त्रिया व 80 वर्षापुढील जेष्ठ नागरिक नागरिकांनी वाहतूक सुविधांची मागणी केली होती. त्यातील 7311 दिव्यांग, 2527 गर्भवती व प्रसुत स्त्रीयांना तर 8787 ज्येष्ठ नागरिकांना असे एकूण 14626 मतदारांना वाहतुकीची सुविधा पुरवण्यात आल्या. दिव्यांग मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी काही मतदान केंद्रांना भेटी देऊन दिव्यांग मतदारांनाही प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचे मनोबल वाढवले.
000000

No comments:

Post a Comment