Search This Blog

Thursday, 17 October 2019

माउंट कार्मेल स्कूल येथे सखी मतदार केंद्र

चंद्रपूरदि. 16 ऑक्टोबर: महिलांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात किमान एक मतदान केंद्र हे संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांचे सखी मतदार केंद्र असावे यासाठी जिल्ह्याच्या निवडणूक विभागाने पुढाकार घेतला आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील माउंट कार्मेल स्कूल येथे सखी मतदार केंद्र निर्माण करण्यात येणार आहे.
लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांचा अधिक रचनात्मक सहभाग वाढावा. याकरिता निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. त्याकरिता मत सखी मतदार केंद्र प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निर्माण करण्यात येणार असून या केंद्रात पोलिसांपासून तर निवडणुकीच्या कामासाठी तैनात असलेल्या अधिकारी कर्मचारी हे सर्वजण महिला असणार आहेत. अशा पद्धतीचे सखी मतदान केंद्र चंद्रपूर मतदारसंघातील माउंट कार्मेल स्कूल येथील  94 व 97 क्रमांकांचे मतदान केंद्राला सती मतदान केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. हे मतदान केंद्र अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी रांगोळीसाफसफाईवर विशेष भर देण्यात येणार आहे. असे मतदान केंद्र स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहेअशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.
0000

No comments:

Post a Comment