Search This Blog

Saturday 12 October 2019

निवडणूक खर्च निरीक्षकांची चिमूर विधानसभा मतदारसंघाला भेट


चंद्रपूरदि. 11 ऑक्टोबर: चिमूर मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्याकरिता निवडणूक खर्च निरीक्षक के. विनोद कुमार यांनी आज दिनांक 11 ऑक्टोबर 2019 रोजी चिमूर येथील उपविभागीय कार्यालयातील निवडणूक खर्च विभागाला भेट दिली.
जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच निरीक्षण करण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेले निवडणूक खर्च निरीक्षक के. विनोद कुमार यांनी आज उपविभागीय कार्यालयातील निवडणूक खर्च विभागाला भेट देऊन संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी मतदार संघातील निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांची निवडणुकीच्या खर्चाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडायच्या असून त्याकरिता  भयमुक्त वातावरण तयार करण्यासाठी  अधिकाऱ्यांनी  प्रयत्न करावे. उमेदवारांचा खर्चाचे निरीक्षण करताना विशेष काळजी घ्यावी. तसेच खर्चात तफावत आढळून आल्यास तात्काळ नोटीस बजावावीअशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
000000

No comments:

Post a Comment