Search This Blog

Friday 11 October 2019

तपासणी पथकांनी अधिक दक्षतेने काम करावे: अमित चंद्रा


पोलीस निवडणूक निरीक्षकांची विविध तपासणी नाक्यांना भेट
चंद्रपूरदि. ऑक्टोबर: येत्या 21 ऑक्टोंबर रोजी निवडणूक असून ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी. याकरिता जिल्ह्याच्या पोलिस विभागाने तसेच निवडणूक यंत्रणेमार्फत नियुक्त केलेल्या तपासणी पथकाने अधिक दक्षतेने काम करावेअशा सूचना भारतीय निवडणूक आयोगामार्फत नियुक्त केलेले पोलीस निवडणूक निरीक्षक अमित चंद्रा यांनी दिल्या. आज दिनांक ऑक्टोबर 2019 रोजी त्यांनी जिल्ह्याच्या सीमेवर तैनात असलेल्या अनेक तपासणी नाक्यांना भेटी दिल्या.
तपासणी नाक्याचे निरीक्षण करत असताना पोलीस निवडणूक निरीक्षक यांनी आज ब्रह्मपुरीबल्लारपूरचिमूर मतदारसंघातील एमईएल नाका चंद्रपूरसिंदेवाही बसस्थानक चौकगांगलवाडीकानपा या तपासणी नाकांना भेटी दिल्या. तसेच नंतर ब्रह्मपुरी येथील नियंत्रण कक्षाला भेट दिली. सोबतच मुल पोलीस उपविभागीय अधिकारी यांना भेट देऊन तेथील गंभीर मतदान केंद्रपोलीस नियंत्रणनिमलष्करी दलाचे नियंत्रणमतदान केंद्रावरील पोलिसांचे नियोजन या संदर्भातील आढावा घेतला. तसेच स्थायी निगराणी पथकाला भेट दिली व पथकाच्या कामगिरीचा आढावा सोबतच त्यांच्या गरजाविषयी त्यांनी चौकशी केली. तसेच तपासणी करताना भेटलेल्या नागरिकांना 21 तारखेला मतदान करण्यासाठी सांगावेअशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच नियंत्रण कक्षाला भेट देऊन तेथील व्यवस्थेचे निरीक्षण केले.
0000

No comments:

Post a Comment