Search This Blog

Friday 18 October 2019

निवडणूक खर्च निरीक्षक यांची स्थायी निगराणी पथकाला भेट


चंद्रपूरदि. 17 ऑक्टोबर: चंद्रपूर जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता जिल्ह्यात दाखल झालेले निवडणूक खर्च निरीक्षक के. विनोद कुमार यांनी आज दिनांक  17 ऑक्टोबर 2019 रोजी विविध स्थाई निगराणी पथकाला भेटी दिल्या.
            त्यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघातील पाटाळा येथील स्थाई निगराणी पथकाला भेट दिली. तसेच सोईट येथील चेक पोस्टला भेट दिली. सोबतच वणी रोडवरील यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील चौकशी पथकाला त्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून वाहनांच्या तपासणीचा आढावा घेतला.
00000

No comments:

Post a Comment