Search This Blog

Thursday 25 January 2024

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना अभियानातंर्गत समितीची कार्यशाळा

 

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना अभियानातंर्गत समितीची कार्यशाळा

चंद्रपूर,दि.25 : रस्ते आणि वाहतूक मंत्रालयातर्फे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना दि. 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाळण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, चंद्रपूर व परिसर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सदस्यांची कार्यशाळा नियोजन भवन सभागृह येथे पार पडली.

कार्यशाळेला जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम तसेच मोटार वाहन विभागातील अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस तसेच तालुकास्तरावरील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

या कार्यशाळेतंर्गत जिल्ह्यातील रस्ते अपघात व मृत्यू यांच्या सद्यस्थितीची माहिती, रस्ता सुरक्षा समस्या व आव्हाने या विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित सदस्यांना सुरक्षित कार्यप्रणाली व हेडन मॅट्रिक्स या संकल्पनेबाबत इत्यंभूत माहिती देण्यात आली. रस्ता सुरक्षा समिती कार्यकारिणी बाबत मार्गदर्शन करून सदस्यांना रस्ता सुरक्षा, जोखमीचे घटक जसे वेग-मर्यादा, सीट बेल्ट, हेल्मेट, मद्यपान करून वाहन चालविणे, सदोष रस्त्यांची रचना आणि तात्काळ वैद्यकीय सुविधा याविषयीची माहिती अवगत करण्यात आली. तसेच दृश्य स्वरूपात नियमित वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी परिसर संस्थेचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी संदीप गायकवाड व सुशील पठारे यांनी यावेळी सांगितले.

०००००

No comments:

Post a Comment