Search This Blog

Friday 19 January 2024

जैवविविधतेचे जतन व संवर्धन ही काळाची गरज

 जैवविविधतेचे जतन व संवर्धन ही काळाची गरज

Ø वनमंत्र्यांच्या हस्ते राज्य जैवविविधता मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

चंद्रपूर, दि. 19 जैवविविधतेचे जतन व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन वन मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या राज्यातील जैवविविधता दर्शविणाऱ्या सन 2024 च्या बहुरंगी वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलेतेव्हा ता बोलत होते.

महाराष्ट्रातील मानचिन्हांसह राज्यातील विविध परिसरात आढळणारे वन्यप्राणीपशू- पक्षीफुले यांच्या सुंदर छायाचित्रांनी ही दिनदर्शिका सजली आहे. महाराष्ट्राची ही जैवविविधता सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजेअसे आवाहनही यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले. मंत्रालयातील परिषद सभागृहात झालेल्या या छोटेखानी प्रकाशन समारंभास  वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांच्यासह वन विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या दिनदर्शिकेत आंबाजारुळशेकरुहरियालनिलवंतपांढरी चिप्पी आणि पापलेट ही मानचिन्हे छापण्यात आली आहेत. याशिवाय,राज्यातील रामसर स्थळे आणि तेथे आढळणारे मोठा रोहित. मोर शराटीरंगीत कारकोचापाणचिरापट्ट कदंब हंसचक्रवाक यांची छायाचित्रे विशेष लक्ष वेधून घेतात. नांदूर मध्यमेश्वरलोणार सरोवर. ठाणे खाडी येथील छायाचित्रे या दिनदर्शिकेत वापरण्यात आली आहेत.

विविध प्रजातींची फुलपाखरेवाघबिबट्या सारखे प्राणीविविध प्रजातींचे पक्षीठोसेघरलिंगमळा येथील धबधबेपश्चिम घाटात आढळणाऱ्या स्थानिक वनस्पती व प्रजातीकास पठारावरील निसर्ग वैविध्यसरपटणारे प्राणीविविध ठिकाणची जैवविविधता वारसा स्थळे आदींच्या छायाचित्रांच्या समावेशाने ही दिनदर्शिका अधिक आकर्षक बनली आहे.

याशिवायप्रत्येक महिनानिहाय वनपर्यावरणजैवविविधता आदी बाबींशी निगडीत असणाऱ्या दिवसांची नोंदही आवर्जून दिनदर्शिकेमध्ये घेण्यात आली आहे.

००००००

No comments:

Post a Comment