Search This Blog

Wednesday, 24 January 2024

2 फेब्रुवारीपासून चंद्रपुरात तीन दिवस जाणता राजा

 




2 फेब्रुवारीपासून चंद्रपुरात तीन दिवस जाणता राजा

Ø चांदा क्लब ग्राउंडवर रंगणार महानाट्य

चंद्रपूरदि. 24 : शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य 'जाणता राजा चंद्रपूरकरांच्या भेटीला येत आहे. राज्याचा सांस्कृतिक विभागजिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका मार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून 23व 4 फेब्रुवारी 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंडचंद्रपूर येथे प्रयोग होणार आहेत.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवारमहानगरपालिका आयुक्त विपिन पालीवालउपायुक्त मंगेश खवलेविशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डेमुख्याधिकारी विशाल वाघजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेशिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे आदी उपस्थित होते

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार पद्मविभूषण इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे  लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग चांदा क्लब ग्राउंडचंद्रपूर येथे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगणार आहे. यासाठी प्रवेशिका असेलमात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.

दररोज सायंकाळी 6 वाजता या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण 200 च्या वर कलाकार करणार आहेत.

000000

No comments:

Post a Comment