Search This Blog

Sunday 7 January 2024

शेती हा मजबूतीचा व्यवसाय होण्यासाठी मिशन जयकिसान अभियानाचा शुभारंभ – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 


शेती हा मजबूतीचा व्यवसाय होण्यासाठी मिशन जयकिसान अभियानाचा शुभारंभ – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 7 : कृषी क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा एक मॉडेल बनावा, या भागातील शेतकरी संपन्न व्हावा, शेतीसह कृषीपूरक उद्योगाला जिल्ह्यात चालना मिळावी आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात कृषीवैशिट्य असलेली गावे विकसित व्हावी, असा संकल्प करुन " मिशन जय किसान" अभियानाचा शुभारंभ चांदा अँग्रो या कृषी प्रदर्शनीपासून आपण केला आहे, या अभियानात शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राऊंडवर चांदा ॲग्रो   2024 चे भव्य आयोजन करण्यात आले असून त्यांच्या  अध्यक्षतेखाली कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या  करण्यात आले. याच महोत्वसात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून दिशा परिवर्तनाची , कास शेती समृध्दीची या ध्यासाने मिशन जयकिसान या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

शेतक-याला नेहमीच आसमानी व अन्य समस्यांना तोंड द्यावे लागते. वाढत्या लोकसंख्येबरोबरच कमी होत जाणारी जमिनधारणा, सिंचनाच्या नैसर्गिक मर्यादा, पर्यायाने वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात अन्नधान्याची उपलब्धता या प्रमुख समस्या आहेत.  पश्चिम महाराष्ट्रात कमी पाणी व जेमतेम जमीन असूनसुद्धा आधुनिकतेच्या भरवशावर तेथील शेती बारमाही हिरवीगार दिसते, याचा अभ्यास करून योग्य नियोजन करावे. जिल्ह्यातील एखादे गाव वैशिष्ट्यपूर्ण असावे;  फुलांचे गाव, एखादे गाव भाजीपाल्याचे, तर एखादे गाव फळबागेचे असावे, या हेतूने पालकमंत्री  यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषि विषयक समस्यांवर मात करण्यासाठी जिल्ह्यात मिशन जयकिसान या अभियानाचा विशेष लोगो व माहितीपुस्तिकेचे अनावरण करुन प्रारंभ करण्यात आली .

 पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना म्हटले आहे कि, हे मिशन पंचसुत्रीवर आधारित असून त्यात पीक घनता (Crop Intensity) वाढविणे,  पिक विवीधता (Crop Diversification) वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे, उत्पादन खर्च कमी करुन पीकाची दर हेक्टरी उत्पादकता (Crop Productivity) वाढविणे, शेतमालास तसेच शेतमालावर प्रकीया करुन मुल्यवर्धन (Marketing, Processing, Value Addition & Access to Market) उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे व बाजाराशी समन्वय साधून देणे, कृषि व कृषि सलग्न विभागांच्या समन्वयाने एकात्मिक शेती पध्दतीस चालना देणे (Integrated Farming System Approach) याआधारे राबवायचे असून यामध्ये सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे.

पीक घनता वाढविण्यासोबतच, रब्बी क्षेत्रात वाढ करणे, पीक लागवड पध्दतीत बदल करणे, पिकांची फेरपालट करणे, नवीन कृषि तंत्रज्ञानाचा प्रचार,प्रसार व अवलंब करणे, पिकांचे मुल्यवर्धन करणे (Value Addition)  करणे , निव्वळ उत्पादकतेत (Crop Productivity) वाढ करणे, शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करुन देणे व बाजाराशी समन्वय साधून देणे तसेच शेतमालावर प्रकीया करुन मुल्यवर्धन (Value Addition) करणे, शेतकऱ्यांचे समुह बचत गट / शेतकरी उत्पादक कंपन्या ( FPO ) तयार करणे व त्याव्दारे मुल्यसाखळी विकसीत करणे आदी कामे या अभियानांतर्गत करण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी यांचे समन्वयातून जिल्हा कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), मत्स्यव्यवसाय विभाग, दुग्धव्यवसाय विभाग, राज्याचा व जि.प. पशुसंवर्धन विभाग, रेशीम शेती विकास विभाग , वन विभाग, कृषि पतपुरवठा  तसेच कृषि क्षेत्राशी संबंधीत इतर सर्व विभागाच्या एकत्रीत प्रयत्नांतून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनां एकत्रीतरीतत्या शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देणे व शेतीक्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणून शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावणे हे काम या अभियानातून करण्यता येणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.

०००००००

No comments:

Post a Comment