Search This Blog

Monday 1 January 2024

बांबू विणकाम प्रशिक्षणातून महिलांना मिळाले उपजीविकेचे साधन

 

बांबू विणकाम प्रशिक्षणातून महिलांना मिळाले उपजीविकेचे साधन

चंद्रपूरदि. 1 : झपाट्याने विस्तार होत असलेल्या बांबू क्षेत्रात प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना उपजीविकेचे साधन प्राप्त व्हावेया उद्देशाने बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली (बीआरटीसी) तर्फे लोहारा येथे आयोजित 15 दिवसीय बांबू विणकाम प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. प्रशिक्षण आपल्या दारी या बीआरटीसी च्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून गावातील 20 महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

बाजारपेठेत असलेली बांबू मॅट ची वाढती मागणी लक्षात घेता महिलांना विविध प्रकारचे बांबू मॅट तयार करण्याच्या प्रशिक्षणाचा लाभ आवश्यक साधनसामुग्रीसह देण्यात आला. या प्रसंगी महिलांनी प्रशिक्षणातून तयार केलेल्या विविध बांबू मॅटची प्रदर्शनी आयोजित करण्यात  आली होती. ज्यामधे जिल्ह्यातील विविध बांबू वस्तू उत्पादक व खरेदीदार यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून महिलांनी तयार केलेल्या विविध बांबू मॅटचे कौतुक केले. अशा प्रशिक्षणातून ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक विकास होईलअसा विश्वास  केंद्राचे संचालक अविनाश कुमार यांनी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केला. यावेळी सरपंच किरण चालखुरेबीआरटीसी चे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवारप्रशिक्षक किशोर गायकवाडसंतोष बजाईतबांबू उद्योजक अन्नपूर्णा धूर्वेअनिल दहागावकरबांस कंपनी लोहाराचे ऐश्वर्य बांगडे आणि गावकरी उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment