सारथी मार्फत वसतीगृह चालविण्यासाठी संस्थांकडून अर्ज आमंत्रित
Ø अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी
चंद्रपूर दि. 1 जानेवारी : पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) चे विभागीय कार्यालय नागपूर येथील वनामती परिसरात सुरू करण्यात आले आहे. सारथी मार्फत छत्रपती शिवाजी महाराज जिल्हास्तरीय वसतीगृह संकूल योजना अंतर्गत खाजगी नोंदणीकृत संस्थांकडून वसतीगृह चालविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकरीता 8 जानेवारी 2024 आहे.
महाविद्यालयातील मराठा, कुणबी या लक्षित गटातील मुले / मुलींसाठी जिल्हानिहाय वसतीगृह चालविण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्थांनी जास्तीत जास्त प्रमाणात यात सहभाग घ्यावा. जेणेकरून शासनाच्या या योजनेचा मराठा, कुणबी या लक्षित गटातील मुला – मुलींना फायदा घेणे शक्य होईल, असे आवाहन सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक, नागपूर यांनी केले आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 आहे. योजनेची सविस्तर माहिती www.sarthi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज दाखल करण्याचा पत्ता : उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी नागपूर (शहर), विभागीय कार्यालय (सारथी), नागपूर, वनामती येथील शरद व ग्रीष्म इमारत, व्ही.आय.पी. रोड धरमपेठ, नागपूर – 440010.
ई मेल आयडी : divnagpursarthi@gmail.com, दूरध्वनी क्रमांक 0712-2992878
००००००
No comments:
Post a Comment