Search This Blog

Friday, 12 January 2024

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता १ ली प्रवेशाकरीता अर्ज आमंत्रित

 

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता  ली प्रवेशाकरीता अर्ज आमंत्रित

Ø 15 फेब्रुवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत

चंद्रपूर दि. 12: सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात नामांकित शाळा निवडीच्या प्रकियेसाठी अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील  इंग्रजी  माध्यमांच्या  नामांकित  निवासी  शाळेमध्ये  इयत्ता  1 ली  मध्ये  प्रवेश  देण्याकरीता योजना असून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक  आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांचे कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेशाकरीता 4 जानेवारीपासून प्रवेश अर्ज नि:शुल्क वितरीत करण्यात येत असून संपूर्ण भरलेले अर्ज विहित कागदपत्रासह दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत स्विकारले जातील.

इयत्ता 1 लीत प्रवेश घेण्याकरीता अटी व शर्ती :

सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षंकित प्रत सादर करावी व प्रमाणपत्राची मुळप्रत तपासणीसाठी सोबत आणावी. जर विद्यार्थ्याचे पालक दारिद्र्य रेषेखालील असेल तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले बी.पी.एल.प्रमाणपत्र जोडावे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लक्ष रु. इतकी असावी. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे दिनांक 25 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयाप्रमाणे असावे.

इयत्ता 1 ली मध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पूर्ण झालेले असावे.  मुला/मुलीचे वय दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी 6 वर्ष पुर्ण झालेले असावे. अर्जासोबत विद्यार्थ्यांचा जन्म तारखेचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार कार्ड जोडण्यात यावे. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय /निमशासकीय  नोकरदार नसावेत, तसे प्रमाणित करण्यात यावे.  तसे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र जोडावे व विद्यार्थ्याचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जोडावे. विद्यार्थ्यांचे पालक विधवा, निराधार, परितक्या असल्यास अर्जासोबत तसा पुरावा जोडावा. निवड झालेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चीत झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकाच्या व पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र अर्जासोबत जोडण्यात यावे.

  वरीलप्रमाणे प्रवेशाबाबतचे दाखले अर्जासोबत जोडून दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करावेत. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा कोणताही विचार करण्यात येणार नाही. शासन निर्णयाप्रमाणे निवड प्रक्रियेचा पूर्ण अधिकार प्रकल्पस्तरीय निवड समिती यांना राहील. शासनस्तरावर निवड झालेल्या शाळेत व मंजुर प्रवेश संख्येच्या अधिन राहून विद्यार्थी निवड प्रक्रिया करण्यात येईल. मंजूर जागेपेक्षा जास्त प्रमाणात आवेदन प्राप्त झाल्यास ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया केल्या जाईल.

या ठिकाणी आहेत प्रवेश अर्ज निशुल्क उपलब्ध :

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर या कार्यालयातंर्गत आदिवासी मुला/मुलींचे शासकीय वस्तीगृह/शासकीय/अनुदानित आश्रमशाळा/ एकलव्य शाळा देवाडा/ नामांकित निवासी शाळा या ठिकाणी प्रवेश अर्ज निशुल्क स्वरूपात उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment